आऊटरच्या वस्त्यांमध्ये नवीन पोस्ट कार्यालये सुरु होणार

27 Feb 2026 21:35:38
पिपळा, दाभा, इसासनीतील नागरिकांना मिळणार सुविधा
 
नागपूर, 
शहराचा झपाट्याने विकास होत असल्याने नागपूरच्या सभोवताल नव्या वस्त्या तयार आहे. New post offices शहरातील आऊटरकडील भागातील नागरिकांच्या गरजेनुसार नवीन ९ पोस्ट कार्यालये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डाक विभागाचे संचालक सुधीर जाखेरे यांनी दिली आहे.
 
post dksl
 
पार्सल बुकिंग, स्पीड पोस्ट, बँकिंग आदींची सुविधा
New post offices  नवीन पोस्ट ऑफीस सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून केल्यानंतर पिपळा, दाभा, इसासनी, बेलतरोडी, पारडी, वाठोडा, सोनेगाव, झिंगाबाई टाकळी, फ्रेंड्स कॉलनी ही कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव डाक संचालनालयाने शहर विभागाकडून मागविला आहे. संबंधित भागात पोस्ट आधारकार्डशी संबंधित कामे, पार्सल बुकिंग, स्पीड पोस्ट, बँकिंग आदींची सुविधा मिळणार आहे. एखाद्या परिसरात पोस्ट कार्यालयाची गरज असल्यास आणि केंद्र शासनाच्या संस्था, हाउसिंग सोसायटी आर्दीनी जागा उपलब्ध करून दिल्यास संबंधित भागात गरजेनुसार कार्यालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नागरिकांकडून प्रतिसाद
New post offices  नागपूरच्या सभोवताल असलेल्या नव्या वस्त्यांमधील नागरिकांना पोस्ट कार्यालयातील विविध कामांसाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. अशा वस्त्यांमधील नागरिकांनी पोस्ट ऑफिस सुरू करण्याची मागणी केल्याने आता नवीन पोस्ट कार्यालये सुरू करण्याच्या निर्णयानुसार पिपळा, दाभा, इसासनी, बेलतरोडी, पारडी, वाठोडा, सोनेगाव, झिंगाबाई टाकळी, फ्रेंड्स भागात महिनाभरात नवीन पोस्ट कार्यालय सुरु होतील. यापूर्वी बहादुरा परिसरात पोस्ट कार्यालय सुरू करण्यात आले असून या पोस्ट कार्यालयाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Powered By Sangraha 9.0