धान उत्पादक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर...

27 Feb 2026 19:00:42
भारतीय किसान संघाच्या आंदोलनात काँग्रेसचे खासदार सहभागी

भंडारा :
Bharatiya Kisan Sangh Andolan  धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आज भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे या मोर्चात काँग्रेसचे खा. प्रशांत पडोळे सहभागी झाले होते. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी होत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
 

dadak 
 
Bharatiya Kisan Sangh Andolan  भारतीय किसान संघाच्या वतीने काही दिवसांपूर्वी प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदारांना निर्वळदन देऊन शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे अशी मागणी केली होती. विशिष्ट मुदतीत या संदर्भात निर्णय न झाल्यास मोर्चा काढण्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
 
 
दरम्यान आज 27 फेब्रुवारी रोजी भंडारा शहरातील हुतात्मा स्मारक येथून शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक या मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. त्या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. Bharatiya Kisan Sangh Andolan भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र पांडे, महामंत्री दिनेश कापगते यांच्यासह भंडाऱ्याचे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आधारभूत धान खरेदी केंद्र संस्था चालक संघाचे अध्यक्ष नेपाल रंगारी यांच्यासह अनेक जण आंदोलनात सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनातून विविध मागण्या रेटून धरल्या. अनेक शेतकरी आज अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांच्या धानाची विक्री थांबली आहे. 40 टक्के शेतकरी अजूनही ध्यान विकला जाईल या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगाम 2025-26 चे धान खरेदीचे उद्दिष्ट अपुरे पडले आहे. हे उद्दिष्ट वाढवून दिल्याशिवाय उर्वरित शेतकऱ्यांच्या धान्याची खरेदी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून केली जाऊ शकत नाही. जवळपास 40 टक्के शेतकरी आज वाढीव उद्दिष्टाच्या प्रतीक्षेत आहेत. हे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे, हेक्‍टरी 20 हजार रुपये बोनस दिला जावा आणि अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.
 
 
काहीशी आक्रमक भूमिका घेण्याचा प्रयत्न झाला. पोलीस प्रशासनाने तो सांभाळून नेला. आंदोलनकर त्यांच्या एका शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधून शेतकरी, धान खरेदी केंद्र चालक या आंदोलनात सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0