भोयनी—कुपटा दरम्यान चुकीचे अंतर दर्शविल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम

27 Feb 2026 18:30:44
मानोरा, 
Bhoyani-Kupta signboard कारंजा—मानोरा राज्य मार्गावरील भोयनी ते कुपटा दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बसविण्यात आलेल्या अंतर दर्शक फलकावर गंभीर त्रुटी आढळून आली आहे. संबंधित फलकावर दिग्रस २९ कि.मी. व पोहरादेवी ३२ कि. मी. असे अंतर दाखविण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात पोहरादेवी गाव प्रथम येत असून, पोहरादेवीपासून दिग्रस सुमारे १० कि.मी. अधिक अंतरावर आहे. या विसंगतीमुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
 
dish Falak
 
Bhoyani-Kupta signboard  रस्ते विकासाच्या कामात लाखो रुपये खर्च केले जातात, परंतु अशा मूलभूत बाबींमध्ये अचूकता नसणे ही गंभीर बाब आहे,अशी प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिली. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील प्रवासी, बाहेरील वाहनचालक तसेच आपत्कालीन सेवांसाठी योग्य अंतर माहिती असणे अत्यंत आवश्यक असते. चुकीच्या फलकामुळे दिशाभूल होण्याची शयता नाकारता येत नाही. सदर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागाने अंतरफलकावरील चूक दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिक व प्रवासी वर्गातून होत आहे.
Powered By Sangraha 9.0