देवळी :
Deoli Hindu Sammelan सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार १ मार्च रोजी दुपारी १ वाजता श्यामसुंदर मन्नाला अग्रवाल धर्मशाळा येथे विशाल हिंदू संमेलनचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वते म्हणून यवतमाळ येथील विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत सेवा प्रमुख राम लोखंडे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी हभप अमरानंद भारती मुगसाजी माऊली आश्रम कोल्हापूर राहतील.
Deoli Hindu Sammelan प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक मोहन अग्रवाल उपस्थित राहणार असून विशेष अतिथी म्हणून संत विष्णू महाराज राजराजेश्वर संस्थान पाटी बाळा, रविंद्र महाराज विलायतकर आळंदीकर लोटांगण महाराज संस्थान गौळ, संत अंबिकादेवी भारती अंबिका संस्थान बोपापूर वाणी, तसेच हभप अंकीचंद दास प्रभु इस्कॉन प्रमुख यांची उपस्थिती राहणार आहे. या संमेलनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदू समाज देवळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.