धनवटे महाविद्यालयातील मराठी दिन

27 Feb 2026 14:39:07
नागपूर,
Dhanwate National College श्री शिवाजी शिक्षण संस्था अंतर्गत धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर येथे मराठी विभागातर्फे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे यांनी भूषविले. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. भारती खापेकर उपस्थित होत्या.प्रमुख पाहुण्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करत कुसुमाग्रज यांच्या कवितांचे रसग्रहण करून त्यामागील आशय आणि सामाजिक संदर्भ उलगडून दाखविले. प्राचार्यांनीही विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे आणि तिच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहण्याचे मार्गदर्शन केले.

pn  
 
 
कार्यक्रमास इंग्रजी विभागप्रमुख डॉ. आस्कर, डॉ. मोटघरे, डॉ. गहारवार, डॉ. चेतन राऊत यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी विभागातील डॉ. पद्मिनी दुरुदकर, डॉ. प्रणाली म्हात्रे, डॉ. सीमा बेहरे, प्रा. स्मिता शहाणे, डॉ. देवेंद्र तातोडे, प्रा. कविता दुर्गे यांनी परिश्रम घेतले. Dhanwate National College विद्यार्थीही बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्मिता शहाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. कविता दुर्गे यांनी केले.
सौजन्य: प्रा.डॉ. प्रणाली म्हात्रे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0