लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे : डॉ. अनिल कावरखे
27 Feb 2026 18:22:30
जिल्हा सल्लागार समितीची बैठक
वाशीम,
लिंग निवड चाचण्या आणि कन्याभ्रूणहत्या या गंभीर सामाजिक समस्या आहेत. स्त्री भ्रूणाच्या संरक्षणासाठी आरोग्य प्रशासनाने कठोर पावले उचलली असून, नागरिकांनी अशा प्रकरणांची माहिती दिल्यास प्रशासन तातडीने कारवाई करेल. लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सवक Dr. Anil Kawarkhe डॉ. अनिल कावरखे यांनी केले.
कन्याभृणहत्या आणि बिघडते लिंग गुणोत्तर हा समाजासमोरील गंभीर प्रश्न असून, या पार्श्वभूमीवर वाशीम जिल्हा प्रशासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि लिंग निवडीस प्रतिबंध घालण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी गर्भलिंग तपासणी करणार्यांविषयी खात्रीशीर माहिती दिली.आणि त्या आधारे गुन्हा उघडकीस आला, तर संबंधित माहितीदारास १ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. ही योजना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविली जात असून, तिचा उद्देश कन्याभृणहत्या थांबवणे, लिंग गुणोत्तर सुधारणे आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे हा आहे. नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Dr. Anil Kawarkhe जिल्हा रुग्णालयात पीसीपीएनडीटी जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हास्तरीय सल्लागार समिती अध्यक्षा डॉ. अलका मकासरे,जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा समुचित प्राधिकारी डॉ. अनिल कावरखे, डॉ. शिवनंदा आमले, डॉ. जया बिबेकर, डॉ. जे. एस. बाहेती, विधी सल्लागार अॅड. राधा नरवलिया आदी उपस्थित होते.