विधी सेवा महाशिबिर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी घेतला तयारीचा आढावा

27 Feb 2026 21:19:02
बुलढाणा, 
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली तालुयातील अमडापूर येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. मौजे अमडापूर देवी संस्थाच्या परिसरात ८ मार्च रोजी सकाळी १० वा. पासून सुरू होणार्‍या या शिबिराच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी Dr. Kiran Patil  डॉ. किरण पाटील आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव नितीन पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या शिबिराच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ आणि कायदेशीर मार्गदर्शन मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
 
 
bul
 
या बैठकीत जिल्हाधिकारी Dr. Kiran Patil  डॉ. किरण पाटील यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांना सेवा शिबिरांच्या अनुषंगाने विशेष सूचना दिल्या. शिबिराच्या ठिकाणी ५० स्टॉल्स लावण्यात येणार असून नगरपालिका, आरोग्य, कृषी, जिल्हा कौशल्य विकास, जिल्हा रेशीम उद्योग, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सहकार, महसूल, समाज कल्याण, एकात्मिक बाल विकास आणि कामगार कल्याण अशा विविध विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना, श्रावणबाळ योजना, आयुष्मान भारत कार्ड, जातीचे व उत्पन्नाचे दाखले, आयुष्यमान कार्ड आणि नवीन रेशन कार्ड यांसारख्या सेवा प्रत्यक्ष जागेवरच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी सर्व विभागांना लाभार्थ्यांची यादी आगाऊ तयार ठेवण्याचे आणि त्यांना शिबिराची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.
 
 
Dr. Kiran Patil  केवळ शासकीय योजनाच नव्हे, तर कायदेशीर साक्षरतेवरही या शिबिरात भर दिला जाणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे वकील आणि तज्ज्ञ यादिवशी नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला देणार असून, प्रलंबित खटल्यांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरामध्ये महिला, शेतकरी व गरजू लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिल्या जाणार आहे. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी केले. या बैठकीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव नितिन पाटील, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, तसेच विविध विभागांचे जिल्हा प्रमुख उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0