नेपाळमध्ये पहाटे ४.७ तीव्रतेचा भूकंप!

27 Feb 2026 11:08:17

Earthquake in Nepal
 
काठमांडू,
Earthquake in Nepal नेपाळच्या पूर्वेकडील भागात शुक्रवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आणि त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. रिश्टर मापन पद्धतीनुसार या भूकंपाची तीव्रता ४.७ इतकी नोंदवली गेली. राष्ट्रीयभूकंप देखरेख आणि संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी हा धक्का बसला. बहुतांश नागरिक गाढ झोपेत असताना अचानक झालेल्या हादऱ्यांमुळे अनेकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली. भूकंपाचे केंद्र संखुवासभा जिल्हा आणि तापलेजंग सीमावर्ती भागाजवळील टोपके गोला परिसरात होते. हे ठिकाण काठमांडूच्या पूर्वेला सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर आहे. भूकंपामुळे जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीबाबत तत्काळ कोणतीही माहिती समोर आलेली नाही; मात्र प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Powered By Sangraha 9.0