फुटाळा फाऊंटन प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात

27 Feb 2026 19:58:59
जागतिक दर्जाचे फाऊंटने लवकर नागरिकांसाठी खुले होणार
महा मेट्रोकडे प्रकल्पाचे काम

नागपूर, 
Futala Fountain Project फुटाळा फाउंटनला जागतिक दर्जाचे मनोरंजन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने महा मेट्रोकडून हालचालींना आता वेग प्राप्त झाला आहे. फुटाळा फाऊंटन प्रकल्पाच्या दुरुस्ती व पुनर्बाधणीच्या सुरुवात झाल्याने हा प्रकल्प शक्य तितक्या लवकर नागरिकांसाठी खुला करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती महा मेट्रोच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

fuktala 
 
फाऊंटन प्रकल्प महा मेट्रोकडे
मुख्यत: फुटाळा परिसरातील पार्किंग लॉटचे काम पूर्ण झाले असून इतर दुरुस्तीचे काम पूर्ण केल्या जाणार आहे. फ्रेंच तज्ज्ञांशी चर्चा झाल्यानंतर फाऊंटन सुरू करण्याचा निर्णय घेतल्या जाणार आहे. सुधार प्रन्यासने फुटाळा फाऊंटन प्रकल्प अधिकृतपणे महा मेट्रोकडे सुपूर्द केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार एकाच यंत्रणेकडून काम केल्या जाणार आहे.
 
 
इलेट्रिकल केबल उपलब्ध
दीर्घकाळापासून रखडलेल्या फुटाळा फाऊंटन प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाल्याने हा प्रकल्प उन्हाळयातील सुट्टीत नागरिकांसाठी खुला होईल. या प्रकल्पाच्या दुरुस्ती व पुनर्बाधणीच्या कामासाठी एकूण चार केबलची आवश्यकता असून इलेट्रिकल केबल उपलब्ध झाल्याने आता महा मेट्रोने प्रत्यक्ष काम सुरू केले आहे.
फ्रेंच तज्ज्ञांचे मार्गदर्शन
Futala Fountain Project  फुटाळा फाऊंटनची यंत्रणा फ्रान्समधून बसविल्याने फ्रेंच तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्या जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला फ्रेंच तांत्रिक पथकाने कारंज्याचे ऑडिट केले होते. दोन वर्षांहून अधिक काळ फाऊंटन बंद असल्याने इलेट्रिकल केबल्स आणि काही घटक खराब झाल्याचे निष्पन्न झाले. मुख्य पंप युनिट्स चांगल्या स्थितीत असले तरी नोझल, वॉशरसारखे अंतर्गत भाग बदलले जाणार आहेत.
दुरुस्तीसाठी १० कोटींचा खर्च
फुटाळा पुनर्विकास प्रकल्पातील आकर्षण ठरलेल्या स्टील बॅनियन ट्री स्ट्रक्चरचे कामही हाती घेतले जाणार आहे. आगामी काही दिवसानंतर तांत्रिक दुरुस्तीबरोबरच संपूर्ण परिसराची स्वच्छता, रंगकाम आणि देखभालीचे होणार आहे. संपूर्ण दुरुस्तीच्या कामासाठी १० कोटींचा खर्च होण्याची शक्यता महा मेट्रोच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.
Powered By Sangraha 9.0