जिल्ह्यातील ४८ ग्रापंवर विद्यमान सरपंचच प्रशासक!

27 Feb 2026 20:58:06
समुद्रपूर, 
Gram Panchayat Sarpanch ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रशासकीय अडचणींमुळे वेळेत पार पडू न शकल्याने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर शासकीय व्यती प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश निघाला होता. मात्र, या आदेशाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने शुक्रवारी एक दिवस ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेऊन सरपंचाची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याची मागणी केली होती. यावर मुदत संपलेल्या ग्रापंवर विद्यमान सरपंचालाच प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निर्णयानुसार संबंधित ग्रापंवर विद्यमान सरपंचाची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात येणार असून जिल्ह्यातील ४८ ग्रापंवर विद्यमान सरपंचच प्रशासक म्हणून राहणार आहेत.
 
 
sarpancha
 
ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालावे, विकासकामे व प्रशासकीय निर्णयांमध्ये अडथळा येऊ नये यासाठी विद्यमान उपसरपंच व ग्रापं सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती प्रशासकास मदत करणार असून नियमांनुसार सर्व अधिकार व कर्तव्ये बजावणार आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने यापूर्वी २३ जानेवारी रोजी निर्गमित केलेले आदेश रद्द करण्यात आले असून नव्या अधिसूचनेनुसार आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.
 
 
Gram Panchayat Sarpanch  दरम्यान, जिल्ह्यातील ४८ ग्रापंवर विद्यमान सरपंचच पुढील आदेशापर्यंत प्रशासक म्हणून राहणार आहेत. यात आर्वी तालुयातील वर्धमनेरी, बेल्हारा, बोथली किन्हाळा, बेनोडा, रोहणा, धनोडी (बहा.), हिवस, कारंजा घा. तालुयातील कन्नमवार ग्राम, पारडी, सेलगाव (उमाटे), नरसिंगपूर, आजनडोह, धानोली, मेटहिरजी, हिंगणघाट तालुयातील आजंती, वणी, सिरुड, मोझरी, कापसी, देवळी तालुयातील कवठा (रेल्वे), आकोली, बोरगाव (आ.), आष्टी शहीद तालुयातील पोरगव्हाण, तळेगाव (श्या.पं.), थार, अंतोरा, सेलू तालुयातील हिंगणी, येळाकेळी, चारमंडळ, समुद्रपूर तालुयातील मोहगाव, लाहोरी, हिवरा, दसोडा, मंगरुळ, कोरा, गिरड, चिखली, पिपरी, साखरा, सावंगी (झा.), सुजातपूर, कांढळी, हळदगाव, उसेगाव, करुर, नारायणपूर, वर्धा तालुयातील वरुड, साटोडा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0