सावरडोह येथे दारूचा महापूर

27 Feb 2026 20:20:31
गावकर्‍यांची पोलिस स्टेशनवर धडक; कारवाईसाठी घातले साकडे
 
कारंजा (घा.), 
Illicit alcohol  तालुयातील सावरडोह येथे दारूचा मोठ्या प्रमाणात महापूर असल्याने गावकरी यामुळे त्रस्त झाले आहे. त्यामुळे आज शुक्रवार २७ रोजी ग्रामपंचायत सावरडोह येथील सरपंच निलेश मरसकोल्हे यांच्या नेतृत्वात गावकर्‍यांनी कारंजा पोलिस स्टेशन वर धडक देत कारवाईची निवेदनातून मागणी केली.
 
 
karanja
 
सावरडोह येथे Illicit alcohol अवैध दारूचे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अवैध दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून गावातील तसेच गावाबाहेरील दारू विक्रते व पुरवठादार गावात दारू विक्री करतात. त्यामुळे युवापिढी दारूच्या आहारी जात आहे. विद्यार्थ्यांवर याचा वाईट परिणाम होत असून त्यांचे शैक्षणिक जीवन धोयात आले आहे. गावात दारू पिण्यार्‍यामुळे तंट्यांचे प्रमाण खुप वाढले आहे. यामुळे गावातील सलोख्याचे वातावरण खराब झाले आहे. दारू विक्रेत्यांवर आळा घालन्याकरिता वारंवार कारंजा पोलिस स्टेशनला मदत मागितली. पण, पाहीजे त्या प्रमाणात सहकार्य मिळत नसल्याचा गावाकर्‍यांचा आरोप आहे. बाहेरगावहून दारूडे गावात येऊन भांडणं करीत असल्यामुळे सामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. पोलिस पाटील बघ्याची भूमिका घेत असल्याने अवैध दारूचे धंदे बंद करण्याकरिता कारवाई करण्यात यावी, अशी विनंती गावकर्‍यांनी निवेदनातून केली आहे. या निवेदनाची प्रत पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांनाही पाठविण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी राजेश गाडरे, मंगेश धडाळे, राहुल मोहिते, मनिषा मोहिते, वामन धुर्वे, निलेश मरस्कोल्हे, कुणाल धुर्वे, आदीं उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0