मानोरा,
तालुयातील भुली येथे अतिवृष्टीमुळे काही नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. मात्र संबंधितांना अद्याप शासकीय मदत न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी भुली येथील धरणात उतरून Jalasamadhi andolan जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.अतिवृष्टीदरम्यान घरातील संसारोपयोगी वस्तू, धान्य तसेच बांधकामाचे नुकसान झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नुकसानग्रस्तांची पाहणी होऊनही मदत जाहीर झाली नसल्याचा आरोप Jalasamadhi andolan आंदोलकांनी केला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी थेट धरणात उतरून आंदोलनाचा मार्ग अवलंबला. किमान होळी सणापूर्वी तरी शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच चुकीच्या व्यक्तींना मिळालेल्या मदतीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केली नसून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या आंदोलनात अजय पुसांडे, राजेश राठोड, मिथुन चव्हाण, चुणीलाल चव्हाण, रोहिदास चव्हाण, देवानंद शिंदे, गणेश पिंगाने आदी नागरिक सहभागी झाले आहेत.