धूलिवंदनाला खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण

27 Feb 2026 18:34:59
 भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण
 सुरेश चोपणे यांची माहिती

चंद्रपूर, 
यंदा जगातून 2 सूर्य आणि 2 चंद्र ग्रहण दिसत असली तरी भारतातून 3 मार्च रोजी म्हणजे, धूलिवंदनाच्या दिवशी केवळ एकच चंद्रग्रहण दिसणार आहेत. भारतातून संध्याकाळी चंद्र उगवताच अरुणाचल प्रदेशातून खग्रास, तर महाराष्ट्रातून Khaṇḍagras chandragrahaṇ खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी दिली.
 
 
chandragrahaṇ
 
खरे तर, भारतात चंद्र अदृष्य असताना दुपारी 3.20 वाजता Khaṇḍagras chandragrahaṇ खंडग्रास ग्रहणाला सुरवात होईल. तर 4.34 वाजता खग्रास चंद्रग्रहण दिसेल आणि 5.32 मिनिटांनी खग्रास ग्रहण संपेल. भारतातून केवळ अरुणाचल प्रदेशातून खग्रास चंद्रग्रहण दिसेल. कोलकाता येथून 90 टक्के, गडचिरोली येथून 30 टक्के, चंद्रपूर, नागपूर येथून चंद्र उगवताना 25 टक्के, पुणे येथे 10 टक्के, तर मुंबई येथे उंचीवर केवळ 1 टक्के खंडग्रास ग्रहण दिसेल. विदर्भात संध्याकाळी 6.18 ते 7.33 वाजता अल्प ग्रहण दिसेल.
 
 
हे ग्रहण पाकिस्तान, अफगाणिस्तानपासून भारतासह पूर्वेकडील देश आस्ट्रेलिया, आशिया, अमेरिका येथे दिसेल. यापूर्वी जगातील काही स्थळी 17 फेब्रुवारीला कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते. तसेच पुढे 12 ऑगस्ट रोजी खग्रास सूर्यग्रहण, तर 28 ऑगस्ट रोजी Khaṇḍagras chandragrahaṇ खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे.
महाराष्ट्रात केवळ दिड तास अल्प ग्रहण
महाराष्ट्रातून केवळ 1 तास 35 मिनिटेच अल्प ग्रहण दिसेल आणि हे ग्रहण पूर्व क्षितिजावर असल्याने फारसे सुंदर दिसणार नाही. घरावरून किंवा टेकडीवरून हे ग्रहण थोडे चांगले दिसेल. ग्रहण दुर्बिणीने फारसे चांगले दिसत नसल्याने साध्या डोळ्याने ते पाहिले पाहिजे.
Powered By Sangraha 9.0