वर्धेच्या लक्ष्मीनारायण मंदिरात ‘एक क्विंटल’ फुलांची उधळण!

27 Feb 2026 21:01:19
वृंदावनच्या कलाकारांची रासलीला रंगणार
 
वर्धा, 
वर्धा शहरातील तब्बल ११८ वर्षांची परंपरा असणार्‍या स्थानिक Lakshminarayan temple श्री लक्ष्मी नारायण मंदिर परिसरात राधा-कृष्णावर फुलांची उधळण होणार आहे. रसायनमुत, सुगंधी आणि पर्यावरणपूरक अशा एक क्विंटल फुलांनी साकारली जाणारी ही अनोखी होळी पाहण्यासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह होता. गेल्या पाच वर्षांपासुन धुळवळीच्या आधी फुलांची होळी खेळण्याची परंपरा सुरू झाली आहे.
 
 
lakshmi mandir
 
गुलालाऐवजी झेंडू, गुलाब, शेवंती आणि विविध सुगंधी फुलांच्या पाकळ्यांनी साजरी होणारी ही नैसर्गिक होळी म्हणजे भती, संस्कृती आणि पर्यावरणप्रेम यांचा संगमच ठरला. फुलांचा वर्षाव, ढोल-ताशांचा निनाद आणि ‘राधे-कृष्ण’च्या जयघोषात मंदिर परिसर अक्षरशः रंगून गेला होता. या सोहळ्याचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे माखन लिला, मयूर नृत्य, रासलीला आणि पारंपरिक लटमार होळीचे सादरीकरण झाले. त्यासाठी वृंदावन येथून आलेल्या २० कलाकारांनी ब्रजभूमीची रंगत आणि भक्तिरसाचा अनुभव दिला. त्यांच्या नृत्य-नाट्यामुळे मंदिर परिसरात जणू वृंदावन अवतरल्याचा भास होत होता.
 
 
Lakshminarayan temple  या मंदिराचा इतिहासही तितकाच प्रेरणादायी आहे. उद्योगपती आणि समाजसेवक जमनालाल बजाज यांनी या मंदिराची स्थापना केली. १७ जुलै १९२८ रोजी महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या हस्ते हे मंदिर हरिजनांसाठी खुले करण्यात आले. सामाजिक समतेचा आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारी ही ऐतिहासिक घटना आजही वर्धेच्या संस्कृतीचा अभिमान आहे. या नैसर्गिक होळीला शहरातील सुमारे तीन हजार नागरिक उपस्थित राहणार असून, कुटुंबासह रंगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. रंग, भती, परंपरा आणि इतिहासाचा अनोखा संगम ही फुलांची होळी ठरली. या महोत्सवात राजस्थानी महिला मंडळ, राधाकृष्ण मंडळासह मंदिरात नित्य भजन करणारेही सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0