लॉयड्स मेटल्सकडून कमलापूरातील हत्ती प्रशिक्षण कार्यक्रमाला भरीव पाठबळ

27 Feb 2026 16:56:47
गडचिरोली, 
lloyds metals लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या कॉर्पोरेट एन्व्हायर्नमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी (सीईआर) उपक्रमांतर्गत कमलापूर एलिफंट कॅम्प येथे 17 ते 23 फेब्रुवारी दरम्यान हत्ती प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. हत्ती व महावत यांच्यातील समन्वय, सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
 

elephant 
 
या प्रशिक्षणासाठी टेप्पाकडू एलिफंट कॅम्प मुदूमलाई टायगर रिझर्व (तामिळनाडू) येथील तज्ज्ञ महावत आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राजेश यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात आदेश पद्धती, हत्तींची वर्तणूक, कंडीशनिंग तंत्र, मानवी पद्धतीने हाताळणी, शिस्त, वर्तणूक व्यवस्थापन तसेच आरोग्य तपासणीवर भर देण्यात आला. हा उपक्रम महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक व मुख्य वन्यजीव संरक्षक एम. एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी पीसीसीएफ (वन्यजीव) व एलएमइएल सल्लागार महिप गुप्ता यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री नवकिशोर रेड्डी, ङचएङ चे महाव्यवस्थापक अमिताव मलिक आणि उपव्यवस्थापक (वन्यजीव) कुम्मारी स्वामी यांचा सक्रिय सहभाग लाभला.
 
उद्घाटन कमलापूरचे वनपरिक्षेत्राधिकारी गौरेश गौतम गडमाडे, प्रोबेशनरी आरएफओ अनिरुद्ध माने व डॉ. नागेश्‍वर रामलाल चौहान यांच्या हस्ते, वन विभागीय अधिकारी व एलएमईएल प्रतिनिधी निक्षेपन गौड यांच्या समन्वयाने झाले. कमलापूर एलिफंट कॅम्पच्या विकासासाठी ङचएङ कडून सिरोंचा वन विभागाला 34.53 लाखांची आर्थिक मदत देण्यात आली असून, पायाभूत सुविधा व सोयीसुविधांच्या उन्नतीसाठी थेट 40 लाख खर्च करण्यात येणार आहे.lloyds metals या माध्यमातून हत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम होण्यासोबतच कॅम्पची कार्यक्षमता आणि इको-टुरिझमलाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0