वर्धेत हिंदू जनजागृती समितीचे निवेदन
वर्धा,
Love Jihad and conversion राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार सन २०१९ ते २०२१ या कालावधीत महाराष्ट्रातून सुमारे १ लाख ७८ हजार ४०० महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यासमवेतच १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या एका वर्षातच ३७ हजार ६९५ महिला आणि मुली लापता झाल्याची माहिती गृहविभागाने दिली आहे. प्रतिदिन सरासरी १०० हून अधिक महिला लापता होणे चिंंताजनक आहे. या घटनांमागे मानवी तस्करी, फसवणूक आणि बलपूर्वक धर्मांतर यांचे प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
या घटना थांबवण्यासाठी उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात जन्मठेपेचे प्रावधान असलेला Love Jihad and conversion लव्ह जिहाद आणि अनधिकृत धर्मांतर विरोधी कठोर अन् अजामीनपात्र कायदा करावा, या मागणीचे निवेदन हिंदुत्ववादी संघटनांनी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्या मार्फत मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले. मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात नमुद केल्यानुसार, लव्ह जिहाद आणि अनधिकृत धर्मांतर थांबवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष तपास पथक स्थापन करावे, ६ महिन्यात प्रकरणांचा निकाल लावण्यासाठी जलदगती न्यायालये चालू करावी, बेपत्ता महिलांसाठी विशेष शोधमोहीम राबवावी तसेच आंतरधर्मीय विवाहापूर्वी पूर्वपरवानगीचे प्रावधान करावे आणि अशा प्रकारचा ठोस निर्णय या अधिवेशनात घ्यावा, अशा प्रमुख मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
Love Jihad and conversion या वेळी हिंदू जनजागृती समितीचे डॉ. पंडीत थोटे, पुरुषोत्तम हरणे, शशिकांत पाध्ये, जगदीश इंगोले, दुर्गा वाहिनीच्या संयोजिका पुनम भोयर, स्वाती दोडके, नगर संयोजक चांदणी फुलवाणी, सनातन संस्थेचे विजया भोळे, भार्गवी क्षीरसागर, तुलसी सब्राह, दर्शना जाधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.