असे वर्धेतील विद्यापीठ काय कामाचे?

27 Feb 2026 05:30:00
वेध
प्रफुल्ल क. व्यास
9881903765

international hindi university विद्यापीठ म्हणजे केवळ विटा-सिमेंटची इमारत नसते; ती राष्ट्राची विचारशाळा असते. इथून पदवी-पदविका घेऊन निघणारी पिढी उद्याचा देश चालवणार असते. म्हणूनच विद्यापीठात कोणते विचार पेरले जातात यावर विद्यार्थ्यांचे, राष्ट्राचे भवितव्य अवलंबून असते. पण, जेव्हा हाच परिसर घोषणा, गटबाजी आणि राष्ट्रविरोधी चळवळीचे केंद्र बनतं तेव्हा असे विद्यापीठ काय कामाचे? असा सवाल या व्यवस्थेला विचारावासा वाटतो. ज्या विद्यापीठाची सर्व कमान राष्ट्रपतींच्या हाती आहे. येथील कुलगुरू राष्ट्रपतींच्या अधिपत्याखाली काम करतात त्या विद्यापीठातील रंजक कहाण्या ऐकल्यानंतर असे विद्यापीठ नसते तर बरे झाले असते, असेच म्हणावेसे वाटते. 212 एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात 8 वसतिगृहे आणि देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षण घेत असलेले वर्धेतील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठ आणि कुलगुरू कोणत्या ना कोणत्या प्रकरणात वादग्रस्त ठरत आले आहेत.
 
 

महात्मा गांधी  
 
 
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ देशात वादग्रस्त घटनांसाठी कुप्रसिद्ध झाले होते. त्याच पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्रात एकमेव असलेले महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ देखील सतत संशयाच्या भोवऱ्यात असते. हिंदी भाषा, भारतीय संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली संस्था जर स्थानिक इतिहासालाच नाकारत असेल तर? महाराष्ट्राच्या भूमीत राहून, मराठी मातीचा श्वास घेत, इथल्या जनतेच्या करातून चालणाऱ्या विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सुट्टी न दिल्याने या विद्यापीठातील शिवभक्तांनी त्रागा सुरू केला आहे. केंद्र सरकारने तीन सुट्ट्या देण्याची परवानगी दिली असल्याचे विद्यापीठातर्फे सांगितले जात असले तर गतवर्षी याच विद्यापीठाने शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दिलेली सुट्टी अवैध होती का? ती अवैध होती तर केंद्र सरकारने सुट्टी देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई का केली नाही? या विद्यापीठात जवळपास 15 वर्षांपूर्वी अबझल खानाच्या वधाचे नाटक सादर करण्यात आले होते. तो विषय ‘तरुण भारत’ने लावून धरला होता. त्या काळात या विद्यापीठामध्ये शिवाजी महाराजांचे साहित्यही उपलब्ध नव्हते. शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नाहीत; ते आमच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. ज्यांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्राची ओळख जगभर निर्माण झाली, त्यांच्याबद्दल उदासीनता दाखवणारे विद्यापीठ ‘राष्ट्रीय’ कसे म्हणावे? येथे पावलोपालवी मराठी माणसाचा अवमान होतो. विदर्भ सोडा, महाराष्ट्रातील अधिकारी-कर्मचाèयांची संख्याही मोजकी आहेे. त्या मोजक्यांचीही अवहेलना केली जाते. उत्तर भारतीय आणि डाव्या विचारसरणीच्या हातात गेलेल्या या विद्यापीठाला तत्कालीन कुलगुरू रजनीश कुमार शुक्ल यांनी ठिकाण्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. येथे मराठीच नव्हे, तर मराठी संतांचा मेळा (रामदास, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, मीराबाई आदी मूर्ती बसवल्या होत्या.) तयार केला होता. वर्धा शहरासोबत या विद्यापीठाची हळूहळू जवळीक निर्माण झाली होती. या विद्यापीठाच्या कुलगुरूंना शाप असल्यागत शुक्लही एका प्रकरणात अडकले. विद्यापीठात राष्ट्र जागरणाची ज्योत पेटत असतानाच त्यांना ऐन राष्ट्रपतींच्या दौऱ्यापूर्वी कुलगुरू या पदावरून हटवण्यात आले. मराठी आणि हिंदीचे मायमावशीचे नाते असताना येथे मराठीला छळले जात आहे. स्थानिक युवकांना नोकरीही दिली गेली होती. परंतु, काही काळातच त्या युवकांवर पुन्हा बेरोजगारीची कुèहाड कोसळली. येथील कॅम्पसमध्ये विचित्र वातावरण तयार झाले आहे. येथे पोस्टर वॉर, आंदोलनं कायम होतात. शुक्ल यांची रवानगी होताच ‘इन्कलाब जिंदाबाद’सारख्या घोषणा देत देशाच्या व्यवस्थेवर टीका करणारे महाभाग विद्यार्थी येथे वर्षोन्वर्षे डिग्रीच्या नावाखाली डेरा टाकून आहेत. समाजमाध्यमांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्र विचाराच्या विरोधात उघडपणे लिहिणारे, टीका करणाऱ्यांना येथील जाहीर कार्यक्रमात निमंत्रित केले जाते. ‘तरुण भारत’मधून वृत्त मालिका चालवत टीकेची झोड उठल्यानंतर कार्यक्रम आवरता घेतला गेला.international hindi university अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ देशाच्या अखंडतेला तडा देणे नाही. विद्यापीठात प्रश्न उपस्थित केल्याच गेले पाहिजेत. चर्चा व्हाव्यात. सोबत राष्ट्रहित जोपासले गेेले पाहिजे. येथे डाव्या विचारसरणीने खोलवर पाय रोवले आहेत. येथे काहींनी आता विचारांना खुंटीवर टांगत संधी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याने त्यांची पोळी शेकली जात आहे. राष्ट्रहित विचारधारेच्या विरोधात कायम चळवळ सुरू असल्याने येथे एक प्रकारे छुपा अजेंडाच राबविला जातो का, याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षणाच्या बाबतीत कुठेही कमी नसलेल्या या विद्यापीठाकरिता केंद्र सरकारने डोळे उघडण्याची वेळ आली आहे. येथे निघणाèया विकास कामांच्या निविदाही विशिष्टांच्या गळ्यात जात असल्याची ओरड असून हे राज्य शिवाजी महाराजांचे की खानाचे, असा प्रश्न पडल्या शवाय राहत नाही.
Powered By Sangraha 9.0