मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

27 Feb 2026 12:49:25
नागपूर,
Marathi language glory day लोकमान्य जनकल्याण शिक्षण संस्थेच्या अंतर्गत ज्योतिबा माध्यमिक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने झाली.विद्यार्थ्यांनी साहित्यिकांच्या वेशभूषेत साकारलेली सादरीकरणे विशेष आकर्षण ठरली. कुसुमाग्रज, सुरेश भट आणि बहीणाबाई चौधरी यांच्या काव्यरचना तसेच एकपात्री प्रयोग विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केले. महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे लेझीम नृत्यही रंगतदार ठरले.
 
bt 
 
 
कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर तांडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्राचार्या अरुणा कडू, पर्यवेक्षक वांढे व चोपडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाने उंची गाठली. Marathi language glory day कार्यक्रमाचे संचालन मेंढेकर यांनी केले.
सौजन्य: जांबुवन्त वांढे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0