कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात 'पदरात निराशाच'

27 Feb 2026 13:14:33
पुणे,
Junner taluka, जुन्नर तालुक्यासह आंबे-माळशेज परिसरातील कांदा उत्पादक सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. बाजारपेठेत कांद्याचे भाव सध्या अत्यंत घसरले असून शेतकऱ्यांना प्रति किलो फक्त १० ते १३ रुपये मिळत आहेत. या पडत्या भावांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भागविणे देखील कठीण झाले आहे आणि बळीराजा पुन्हा चिंतेच्या गर्तेत आहे.
 

Junner taluka, 
ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हान, पाचघर, उंब्रज, खामुंडी, डुंबरवाडी, धोलवड, उदापूर, डिंगोरे, पिंपळगाव जोगा यांसह परिसरातील अनेक गावांमध्ये कांदा हा मुख्य नगदी पीक आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून, मागणी तुलनेने कमी असल्याने भाव कोसळले आहेत.कांदा लागवडीसाठी एकरी हजारो रुपये खर्च येतो. यामध्ये बियाणे, खते, औषध फवारणी, मजुरी आणि वाहतूक यांचा समावेश असतो. शेतकऱ्यांनी हा खर्च भागवण्यासाठी सोसायटी कर्ज, सावकारी कर्ज, बँक फायनान्स किंवा सोने तारण कर्जाचा आधार घेतला होता. मात्र सध्या मिळणारा भाव इतका अल्प आहे की मजुरी आणि वाहतूक खर्च वजा करता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काही उरत नाही आणि कर्जफेड करणेही अशक्य झाले आहे.
 
 
10 रुपये किलो कांदा
 
 
ओतूर परिसरातील Junner taluka, शेतकरी म्हणाले, “रात्रंदिवस घाम गाळून पीक उभे केले, पण आता बाजारात विकायला नेल्यावर पदरात निराशाच पडत आहे. १० रुपयांत तर साधी मजुरीही निघत नाही. शासनाने कांदा उत्पादकांना वाऱ्यावर सोडले आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून आधार द्यावा.”कांदा व्यापारी आणि आडतदार प्रदीप शांताराम मुरादे म्हणाले, “सध्या बाजारपेठेत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, मात्र मागणी तितकी नाही. १० ते १३ रुपये किलो हा दर शेतकऱ्यांसाठी अत्यंत तोट्याचा आहे. खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ बसत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. निर्यातीबाबतचे धोरण आणि बाजारातील अस्थिरता शेतकऱ्यांसाठी मोठा धोका निर्माण करत आहेत. शासनाने यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.”ओतूर-रोहोकडी येथील शेतकरी प्रमोद ढमाले म्हणाले, “बियाणे आणि खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, तरीही बाजारात भाव मिळत नाही. १० ते १२ रुपये किलोने कांदा विकून पदरात काही उरत नाही. वाहतुकीचा खर्चही खिशातून द्यावा लागतो. केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने सानुग्रह अनुदान जाहीर करावे.”
 
 
जुन्नर तालुक्याचा पश्चिम आणि Junner taluka, पूर्व पट्टा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. कांद्याच्या भावातील या घसरणीमुळे ग्रामीण भागातील बाजारपेठांवरही थेट परिणाम दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळे व्यापाऱ्यांची उधारी आणि दैनंदिन आर्थिक उलाढाल थंडावली आहे. कांद्याच्या भावातील घसरणीमुळे शेतकरी आता आक्रमक झाले असून, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देईल का, हा प्रश्न आता गंभीर स्वरूप घेऊन उभा राहिला आहे.
Powered By Sangraha 9.0