तीन वर्षांत 5300 वर दाम्पत्यांचा झाला घटस्फोट

27 Feb 2026 11:59:44
अनिल कांबळे
नागपूर,
couples divorced कुटुंबातील मतभेद, स्वाभिमान दुखावणे, काैटुंबिक वादविवाद या कारणांमुळे काैटुंबिक जीवनाची वाताहत हाेत असून दाम्पत्यांचा घटस्फोटाकडे जास्त कल आहे. गेल्या तीन वर्षांत 9 हजार 323 दाम्पत्यांनी काैटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 5 हजार 347 दाम्पत्यांनी घटस्फोट घेऊन आपापले जीवन विभक्तपणे जगणे सुरु केले आहे. ही स्थिती सामाजिक वातावरणासाठी विघातक आहे.
 
 
घटस्फोट
 
 
राज्यातील घटस्फोटांची वाढती संख्या ही केवळ कायदेशीर बाब नसून, सामाजिक बदलाचे द्याेतक मानली जात आहे. काैटुंबिक मूल्ये जपण्यासाठी संवाद, समजूतदारपणा आणि परस्परांचा आदर यांना अधिक महत्त्व देण्याची गरज आहे. मुलगी अठरा वर्षांची हाेताच आईवडिलांना तिच्या लग्नाची घाई असते तर मुलगा नाेकरी, व्यवसाय सांभाळून चार पैसै कमवायला लागल्यास त्यालाही लग्नाचे वेध लागते. काही पालक मुलीचे शिक्षण सुरु असताना तिच्यासाठी स्थळ बघणे सुरु करतात तर उलटपक्षी मुलाचे पालक मुलगा पैसे कमवून स्वतःचा संसार सांभाळण्याची ऐपत येईपर्यंत लग्नाचा विचार करीत नाहीत. प्रेमविवाह, पळून जाऊन लग्न करणे, अनैतिक संबंध, प्रेमसंबंध याची धास्ती असल्यामुळे पालकवर्ग मुलगी वयात येताच लग्न उरकून टाकतात. मात्र, शिक्षण अपूर्ण किंवा शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही लग्नगाठ लागल्यामुळे अनेक तरुणी नाईलाजास्तव संसार करीत असतात. यासाेबतच युवकांमध्येही आईवडिलांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करणे किंवा प्रेयसीला नकार देऊन लग्न करण्यासाठी तयार झाल्यामुळेसुद्धा संसारात विघ्न पडतात. सध्याच्या स्थितीत विवाहितांना पती व सासरच्या मंडळीकडून हाेणारा मानसिक व शारीरिक त्रास सहन न झाल्यामुळे थेट घटस्फोटाकडे कल वाढला आहे. अभय काेलारकर यांना प्राप्त माहितीनुसार, गेल्या 2023 ते 2025 या तीन वर्षांत 9 हजार 323 दाम्पत्यांनी घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यापैकी 5347 दाम्पत्यांनी न्यायालयातून घटस्फोट घेतला. तर 3 हजार 22 घटस्फोटाचे खटले कुटुंब न्यायालयात प्रलंबित आहेत.
..........
अनैतिक संबंधामुळे सर्वाधिक घटस्फोट
काही युवक किंवा युवतीचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध असतात. लग्नानंतरही दाेघांचे प्रेमसंबंध कायम असतात. त्यावरुन घरातील वातारण बिघडते. तसेच विवाहित पुरुष आणि महिलांचेही अनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यास संसार विस्थापित हाेताे. प्रेमविवाह झाल्यानंतर तर प्रेयसीला पत्नीची भूमिका निभावताना अडचणीचे वाटते. असा कारणांमुळे घटस्ाेटाचा कल वाढला आहे.
.......
गैरसमज आणि ‘ईगाे’ मुख्य कारण
अनेकदा पती किंवा पत्नीमध्ये गैरसमज निर्माण हाेतात तर कधी एकमेकांचा स्वाभिमान दुखावल्यामुळे घरातील वातावरण बिघडते. दाेघेही माघार घ्यायला तयार नसतात.couples divorced तसेच सासर किंवा माहेरच्या लाेकांनी मुला-मुलींच्या संसारात अतिहस्तक्षेप केल्यामुळेसुद्धा अनेक संसार तुटण्याच्या काठावर असतात. बदलती जीवनशैली, करिअरकेंद्री दृष्टिकाेन, वाढती आर्थिक स्वावलंबनाची भावना आणि नातेसंबंधांमधील संवादाचा अभाव ही वाढीची प्रमुख कारणे आहेत.
.....
घटस्फोटाची आकडेवारी
वर्षे घटस्फोटाचे खटले घटस्फोट मंजूर घटस्फोट प्रलंबित
 
2023 2540 1705 1040
2024 2596 1562 847
2025 3952 1767 1085
2026 (जाने) 435 313 45
Powered By Sangraha 9.0