महाशिवरात्रीला ११ हजार १५७ शिवभक्तांनी घेतला एसटीचा लाभ

27 Feb 2026 19:44:01
पचमढी यात्रेतून एसटीने मिळविले ४१ लाखांवर उत्पन्न
 
नागपूर, 
Pachmarhi Yatra ST bus महाशिवरात्रीनिमित्त पचमढी येथील यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागाने जादा बससेवा दिली होती. लालपरीमध्ये एकूण ११ हजार १५७ पचमढी-नागपूर- पचमढीदरम्यान प्रवास केला. यातून नागपूर पचमढी यात्रा विवरण विभागाला ४१ लाखांवर उत्पन्न मिळाले. मुख्यत: शिवभक्तांची संख्या बघता नागरिकांचा लालपरी वरील विश्वास कायम असून नागपूर विभागाला महाशिवरात्री पावली असेच म्हणावे लागेल. महाशिवरात्रीनिमित्त मध्यप्रदेशातील नर्मदापूरम जिल्ह्यातील पचमढी येथे मोठी यात्रा भरते. महादेवाच्या यात्रेला नागपूरच नव्हे, तर विदर्भातून शिवभक्त जातात. महाशिवरात्री फेब्रुवारीला होती.
 
 
st buks
 
Pachmarhi Yatra ST bus  मात्र शिवभक्तांना पचमढीला जाणे आणि परत येण्यासाठी नागपूर विभागातर्फे ७ ते १५ फेब्रुवारीदरम्यान नागपूर ते पचमढी आणि ८ ते १६ फेब्रुवारीदरम्यान पचमढी ते नागपूरदरम्यान जादा बसेस चालविल्या होत्या. यात गणेशपेठ आगाराच्या २०, घाट आगाराच्या २२ अशा एकूण ४२ बसेसचा समावेश होता. जादा बससेवेमध्ये महाराष्ट्रात सर्व सवलती लागू पण मध्यप्रदेश राज्याच्या क्षेत्रात पूर्ण तिकीट आकारण्यात आले. दहा दिवसांच्या सेवेत जादा बसेसच्या एकूण २६० फेर्‍या झाल्या. यामध्ये ११ हजार १५७ शिवभक्तांनी नागपूर-पचमढी-नागपूर प्रवास केला. पचमढी यात्रेसाठी धावलेल्या जादा बसेसच्या माध्यमातून सवलतीसह ४१ लाख हजार ९३ रुपये उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत जमा झाले.
Powered By Sangraha 9.0