वाघ्या–मुरळी परंपरेवर भाष्य करणारा ‘फुला’ १७ एप्रिलला प्रदर्शित

27 Feb 2026 11:16:41
जेजुरी
Phula Marathi movie, अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या–मुरळी परंपरेवर आधारित ‘फुला’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे वाघ्या–मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यास चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या १७ एप्रिल रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
 

 Phula Marathi movie, Phula film release date 17 April, 
पै. अजित शिवाजी जाधव यांनी ‘फुला’ची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांची प्रस्तुती आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक जावीर यांनी केले असून पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील शिक्षक समाधान ऐवळे यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.चित्रपटासाठी सक्षम तांत्रिक टीम कार्यरत असून अमर देवकर यांचे सर्जनशील दिग्दर्शन, प्रताप जोशी यांचे छायांकन, अतुल लोखंडे यांचे कला दिग्दर्शन आणि राहुल प्रजापती यांचे संकलन लाभले आहे. वेशभूषा कोमल जावीर आणि अक्षता पाटील यांनी साकारली असून रंगभूषा समाधान भोरे यांनी केली आहे. गीतलेखन रवीकिरण जावीर आणि समाधान ऐवळे यांनी केले आहे.
 
 
चित्रपटातील गाणी Phula Marathi movie वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली इंगवले, वैष्णवी अदोडे आणि आकाश नवगिरे यांनी गायली आहेत. प्रियांतिका, आरोही गडदे, मंजुषा खेत्री, संतोष शिंदे, देवा गाडेकर, रविकिरण जावीर, सनी कदम, छाया आदट आणि शरद लांडगे हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे चित्रीकरण आणि संपूर्ण टीम आटपाडी गावातील असून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे, ही बाब विशेष लक्षवेधी ठरत आहे.‘फुला’ ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षगाथा आहे. तमाशा फड आणि जागरण–गोंधळ या पारंपरिक लोककलेच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कथा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जिवंत चित्र उभे करते. दिग्दर्शक अभिषेक जावीर यांच्या मते, हा चित्रपट केवळ एका मुलीची शोकांतिका नसून पारंपरिक लोककलांमध्ये अडकलेल्या स्त्री कलाकारांच्या अस्तित्वाचा प्रामाणिक दस्तावेज आहे. समाज त्यांच्या कलेचा स्वीकार करतो; मात्र त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देत नाही, ही वस्तुस्थिती चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.ग्रामीण वास्तव, लोककलेचा गंध आणि सामाजिक आशय यांचा संगम साधणारा ‘फुला’ प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0