होळीसाठी वृक्षतोड केल्यास दंडात्मक कारवाई

27 Feb 2026 13:30:50
पुणे,
Holi tree cutting, होळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी लाकूड किंवा गोवऱ्याचा वापर करून होळी पेटवली जाते, परंतु अनधिकृतपणे झाडे तोडणे किंवा जाळणे हा गुन्हा मानला जातो. पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, कोणतीही व्यक्ती विनापरवाना वृक्षतोड करत असल्यास किंवा झाडांना हानी पोहोचवल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.
 

Pune Garden Department, Holi tree cutting, 
महापालिकेच्या माहितीनुसार, महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम १९७५ अंतर्गत असा प्रकार आढळल्यास संबंधितांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. नागरिकांनी होळी सणाच्या निमित्ताने झाडांची तोड करू नये, असे आवाहनही विभागाने केले आहे.ज्या ठिकाणी वृक्षतोड किंवा झाडांचा नाश होत असल्याचे दिसले, त्या प्रकरणी तक्रार करण्यासाठी १८००१०३०२२२ या क्रमांकावर कॉल करता येईल, व्हॉटसअॅपद्वारे ९६८९९००००२ या क्रमांकावर किंवा ऑनलाइन [www.complanit.punecorporation.org](http://www.complanit.punecorporation.org) या संकेतस्थळावर नोंद करता येईल.
Powered By Sangraha 9.0