’रेलवन’ सुपरअ‍ॅप, दोन कोटी प्रवाशांकडून झाले डाउनलोड

27 Feb 2026 19:25:51
दररोज सरासरी ६ लाख तिकिटांचे आरक्षण

नागपूर, 
भारतीय रेल्वेच्या 'RailOne' super app रेलवन’ सुपरअ‍ॅपला लाँचनंतर अवघ्या ८ महिन्या २ कोटी प्रवाशांनी डाउनलोड केले आहे. फेब्रुवारी महिन्यात दररोज ५ अधिक तिकीट बुकिंगची ’रेलवन’च्या माध्यमातून नोंद झाली असून, दररोज सरासरी ६ लाख तिकीट आरक्षण या अ‍ॅपद्वारे होत असल्याचा माहितीवजा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. भारतीय रेल्वेचे हे अधिकृत सुपरअ‍ॅप सेंट्रल फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीमने विकसित आहे. या अ‍ॅपचे उद्घाटन १ जुलै २०२५ रोजी झाले होते. ’रेलवन’ अ‍ॅपमध्ये आरक्षित तिकीट अनारक्षित तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, पीएनआर स्थिती, गाड्यांची चौकशी तसेच इतर प्रवासी केंद्रित सुविधा एकाच सुलभ इंटरफेसवर उपलब्ध आहेत.
 

Ral one 
 
त्यामुळे प्रवाशांना विविध सेवांसाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करण्याची गरज उरलेली नाही. त्यामुळे देशभरातील रेल्वे प्रवाशांकडून या अ‍ॅपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने जारी केली. दररोज सुमारे ६ लाख तिकीट हाताळण्याची क्षमता या अ‍ॅपमध्ये असल्याचे सध्याच्या आकडेवारीतून स्पष्ट झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. इंटरफेसवर एआय आधारित फिचर 'RailOne' super app  रेलवन मध्ये सातत्याने नवनवीन सुविधा -आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित फिचर समाविष्ट केल्या जात आहे. प्रवाशांच्या सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने हे अ‍ॅप अधिक चांगले करण्यावर भर देण्यात येणार असल्याचा दावाही रेल्वे प्रशासनाने केला आहे.
Powered By Sangraha 9.0