राणा दाम्पत्याची होळी यंदाही मेळघाटात

27 Feb 2026 21:29:43
२ व ३ फेब्रुवारीला दौरा
 
अमरावती, 
दरवर्षीप्रमाणे यंदाही Rana couple's Holi in Melghat आ. रवि राणा व भाजपा नेत्या, माजी खासदार नवनीत राणा हे दाम्पत्य मेळघाटातील आदिवासीबहूल भागात जाऊन स्थानिक आदिवासी बांधवांसोबत पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करणार आहेत. २ व ३ मार्च रोजी त्यांचा दोन दिवसीय दौरा चिखलदरा व धारणी तालुक्यात होणार आहे.
 
 
Rana
 
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील दुर्गम व आदिवासीबहूल गावांमध्ये जाऊन ते नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. या दौर्‍यात हरीसाल, कंजुली, सुसर्दा, साद्राबाडी, बासपानी, दिया, धरममहू, ढाकरमल, चाकर्दा व उतावली आदी गावांना भेटी देणार आहेत. प्रत्येक गावात स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी व शासकीय योजनांबाबत माहिती दिली जाणार आहे. या दौर्‍यादरम्यान मेळघाटातील पारंपरिक पद्धतीने होळी पूजन व होळी दहन कार्यक्रमात सहभाग घेत सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात येणार आहे. आदिवासी संस्कृती, परंपरा व लोककलेचा सन्मान राखत राणा दाम्पत्य स्थानिक बांधवांसोबत सण साजरा करणार आहेत.
 
 
Rana couple's Holi in Melghat  तसेच मेळघाटातील धारणी तालुक्ययातील शिवझिरी घाट येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या मजुरांच्या कुटुंबियांची ते प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन करणार आहेत. जखमींना योग्य उपचार मिळावेत व मृतांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. या दोन दिवसीय दौर्‍यामुळे मेळघाटातील आदिवासी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गावागावांत त्यांच्या स्वागताची तयारी सुरू आहे. सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची परंपरा यंदाही आ. रवि राणा व माजी खासदार नवनीत राणा कायम ठेवणार आहे.
Powered By Sangraha 9.0