अनिल कांबळे
नागपूर,
sexual assault एका तरुणीला गेल्या आठ वर्षांपूर्वी युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. लग्न करण्याची वेळ आली असता युवकाने अन्य युवतीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चिडलेल्या तरुणीने पाेलिसात तक्रार दिली. या प्रकरणी काेतवाली पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. आशूताेष दार्लिंगे (27, महाल) असे आराेपी प्रियकराचे नाव आहे.
पीडित मुलगी माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असताना तिची फेसबुकवरुन आशूताेष दार्लिंगे याच्याशी ओळख झाली. दाेघेही फेसबुकवर मित्र झाले. त्यांच्यात चॅटिंग सुरु झाली. दाेघांची महालमध्ये भेट झाली. साेबत काॅी घेतल्यानंतर आशूताेषने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दाेघांचेही प्रेमसंबंध सुरु हाेते. महाविद्यालयीन शिक्षण घेताना दाेघांनीही आपापल्या कुटुंबियांना प्रेमप्रकरणाची माहिती दिली. दाेघांच्याही कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला संमती दर्शवली. त्यामुळे दाेघेही पती-पत्नीप्रमाणे राहत हाेते. यादरम्यान, आशूताेषने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सध्या पीडित तरुणी 23 वर्षांची असून तिच्या कुटुंबियांकडून लग्नाबाबत विचारणा हाेत हाेती. त्यामुळे तिने आशूताेषकडे लग्नाबाबत विचारणा केली. मात्र, त्याने नातेवाईक असलेल्या युवतीशी लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तरुणीला धक्का बसला. तिने आईवडिलांशी याबाबत चर्चा केली. तिने आशूताेषच्या कुटुंबियांना माहिती दिली. मात्र, आशूताेष मानायला तयार नसल्यामुळे शेवटी काेतवाली पाेलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. ठाणेदार रितेश अहेर यांनी गांभीर्य दाखवून लगेच गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरु आहे.