सिंहगड किल्ल्यात कामाला आलेल्या मजुराचा मृतदेह दरीत आढळला

27 Feb 2026 13:51:06
पुणे
Sinhagad Fort worker death पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ला परिसरात कामासाठी आलेल्या एका मजुराचा मृतदेह कल्याण दरवाजाजवळील दरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव दशरथ शंकर धोत्रे (वय अंदाजे ३५) असून ते श्रीरामपूर येथील रहिवासी होते, असे पोलिसांनी सांगितले.
 

Sinhagad Fort worker death 
माहितीनुसार, धोत्रे चार दिवसांपूर्वी किल्ल्यावर ठेकेदाराकडे कामासाठी आले होते. ते त्यांच्या चार-पाच सहकाऱ्यांसोबत नरवीर तानाजी मालुसरे समाधी परिसरातील पुरातत्व विभागाच्या कामावर कार्यरत होते. सर्व मजूर किल्ल्यावरच मुक्कामाला होते.मध्यरात्रीनंतर बुधवारी धोत्रे अचानक बेपत्ता झाले. त्यांच्या सहकाऱ्यांना वाटले की तो गावाकडे गेला असेल, कारण त्यांच्याशी फोनवर संपर्कही झाला नव्हता. मात्र, शुक्रवारी सायंकाळी पर्यटकांना कल्याण दरवाजा परिसरातील दरीत मृतदेह दिसल्यावर या घटनेचा उलगडा झाला.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलीसांनी सांगितले की मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टेम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. अपघाती मृत्यू की अन्य काही कारण, याबाबत तपास सुरू आहे.स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभागाकडूनही या घटनेबाबत अधिक माहिती घेतली जात असून, किल्ल्यावर काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेसंदर्भात Sinhagad Fort worker death प्रश्न उपस्थित झाले आहेत.या घटनेमुळे सिंहगड किल्ला परिसरात कामाच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे आणि प्रशासनाने कामगारांसाठी सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0