२६४ कोटींचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर
वाशीम,
Washim Municipal Council Budget वाशीम नगर परिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा २६४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प लेखाधिकारी योगेश मांदळे यांनी मुख्याधिकारी नीलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सभेसमोर सादर केला. या अर्थसंकल्पास मान्यवरांच्या उपस्थितीत सभेने मंजुरी दिली. अर्थसंकल्पात शहराच्या विकासाला चालना देणार्या विविध कामांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. रस्ते विकासासाठी तब्बल ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, खुल्या जागांचे विकास व सुशोभीकरणासाठी ७ कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
वाढीव पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच रस्त्यावरील दिव्यांसाठी १० कोटी रुपये आणि नाली-गटार व मलनिस्सारण व्यवस्थेसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासह इतर विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे. शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Washim Municipal Council Budget यावेळी नगराध्यक्ष अनिल केंदळे, उपाध्यक्ष राजू भांदुर्गे यांच्यासह सर्व सभापती, स्थायी समिती सदस्य व नगरसेवक उपस्थित होते. अर्थसंकल्प मंजुरीनंतर विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. वाशीम शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, पथदिवे, नाली-गटार व मलनिस्सारण या महत्त्वाच्या विषयांसाठी निधीची ठोस व्यवस्था करण्यात आली आहे. या माध्यमातून शहराच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिक्रीया नगराध्यक्ष अनिल केंदळे व मुख्याधिकारी नीलेश गायकवाड यांनी व्यक्त केली.