४०.५६ कोटी रुपये आर्णी नपचा अर्थसंकल्प

28 Feb 2026 21:36:17
भूमिगत गटारे व मूलभूत सुविधा पूर्ण करण्यावर भर

आर्णी, 
शुक‘वार, २७ फेब‘ुवारी रोजी Arni Municipal Council Budget आर्णी नगर परिषद अध्यक्ष नालंदा भरणे यांनी नपचा २०२६-२०२७ साठी ४० कोटी ५६ रुपये बचतीचा अर्थसंकल्प सादर केला. भूमिगत गटारे व मूलभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. अध्यक्ष नालंदा भरणे यांनी शहरातील मूलभूत सुविधांच्या पूर्ततेवर भर दिला. शिक्षण व आरोग्यावर विशेष काम तसेच त्याची अंमलबजावणीदेखील केली जाईल. केंद्र सरकारच्या निधीतून होणार्‍या नमो उद्यान योजनेंतर्गत निधीचा वापर करून मध्यभागी एक भव्य उद्यान साकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 

nalanda 
 
नपचे उत्पन्न वाढवण्यासाठी नपच्या मोकळ्या जागेवर व्यावसायिक गाळे बांधकाम, अमृत योजना २ अंतर्गत केंद्र सरकार व राज्य नगरविकास विभागाकडून भूमिगत गटार व्यवस्था करणार, असेही अध्यक्षांनी सांगितले. नगरोत्थान योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून निधी आणून विकास कार्यासाठी वापरला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपण विकासात्मक दृष्टीकोन स्वीकारून व सर्वांना सोबत घेऊन शहराचा विकास करू, असे नप अध्यक्ष नालंदा भरणे यांनी सांगितले.
 
 
या Arni Municipal Council Budget  अर्थसंकल्पात आरोग्य, पाणी, क‘ीडा, शिक्षण, स्वच्छता, महिला व बालकल्याण, दिव्यांगांचे सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतूदही करण्यात आली आहे. हे अंदाजपत्रक काही दुरुस्त्यांसह सभागृहात मंजूर करण्यात आले. या सभेत स्थायी समितीचे सदस्य, सर्व सभापती, सर्व नगरसेवक व स्वीकृत सदस्यांसह नप मु‘याधिकारी रवींद्र राऊत, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. अर्थसंकल्पाचे वाचन लेखापाल अनूप कांबळे यांनी केले. या अंदाज पत्रकाची प्रारंभिक शिल्लक २५ कोटी ९१ लाख ४६ हजार ५४७ रुपये असून एकूण महसुली जमा १३ कोटी ५० ८२ हजार रुपये आहे. तर महसुली खर्च १३ कोटी २२ लाख ४२ हजार ५०० रुपये खर्च आहे. भांडवली जमा ८६ कोटी ५३ लाख २८ हजार असून भांडवली खर्च ७२ कोटी ७७ लाख ६ हजार रुपये आहे. यामुळे आर्णी नगर परिषदेत ठेवण्यात आलेला ४० कोटी ५६ लाख ८ हजार ४७ शिलकीचा अर्थसंकल्प सभागृहाने सर्वानुमते संमत केला.
अनेक महत्वपूर्ण तरतुदी
या अर्थसंकल्पात मु‘यत: मु‘य रस्ते सिमेंटीकरण, घनकचरा संकलनासाठी वाहन खरेदी व कचरा डेपो, शहरात हायमास्ट लावणे, रोड स्विपिंग मशिन, रस्ते, नाल्या दुरुस्ती, नगर परिषद सुसज्ज इमारत, व्यावसायिक दुकाने, शहर विकास व सौंदर्यीकरणासाठी अनेक महत्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत, अशी माहिती अध्यक्ष नालंदा भरणे, उपाध्यक्ष निलेश गावंडे व मु‘याधिकारी रवींद्र राऊत यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0