अत्याधुनिक ’कवच’ प्रणाली कार्यान्वित

28 Feb 2026 19:11:29
स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली

नागपूर,
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात अत्याधुनिक 'Kavach' train system ’कवच’ ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टिम प्रणालीच्या अंमलबजावणीत सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय प्रगती होत असून रेल्वे सुरक्षा अधिक भक्कम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. ही स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली रेल्वेगाड्यांमधील संभाव्य टक्कर टाळण्यासाठी आणि अपघातांचे कमी करण्यासाठी प्रभावी ठरत आहे.
 
 
Kavach
 
नागपूर विभागांतर्गत एकूण ९४ स्थानके 'Kavach' train system  ’कवच’ प्रणालीसाठी नियोजित आहेत. त्यापैकी ३ स्थानकांवर स्टेशन टीसीएएस प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आली. तर ९ स्थानकांवर अंमलबजावणीचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय, समपार फाटकांवरील सुरक्षितता अधिक सक्षम करण्यासाठी ४ ठिकाणी लेव्हल क्रॉसिंग-टीसीएएस प्रणाली सुरू करण्यात आली. यामुळे रेल्वे मार्गावरील व मानवरहित समपार फाटकांवरील जोखीम कमी होणार आहे. टप्पा-१ अंतर्गत रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग बसविण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. उद्दिष्ट असलेल्या ८,४६० टॅगपैकी ८,३९१ टॅग बसविण्यात आले. या प्रक्रियेमुळे ९४ पैकी ९२ ब्लॉक सेक्शन कव्हर करण्यात आले आहेत. तसेच टप्पा-२ अंतर्गत ३ स्थानकांवर आरएफआयडी बसविणे आणि त्यांची चाचणी पूर्ण करण्यात आली आहे.
 
 
'Kavach' train system  लोको निष्कर्षही समाधानकारक ठरले आहेत. टप्पा-२ अंतर्गत पारासिया-इकलेहरा-पालाचौरी मार्गावर लोको ट्रायल्स यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यात १०.७९ किलोमीटर मार्ग आणि २ ब्लॉक सेक्शनचा समावेश आहे. त्याचप्रमाणे फेज-१ अंतर्गत नियोजित ९९१.४२ रूट किलोमीटरपैकी ७१८.७४ रूट किलोमीटरवर लोको ट्रायल्स पूर्ण करण्यात आल्या. या चाचण्यांमुळे प्रणालीची आणि अचूकता तपासून पाहण्यात आली.
Powered By Sangraha 9.0