एपीएल क्रिकेटमधील 40 हजारांचा निधी वृद्धाश्रमाला

28 Feb 2026 11:06:17
तभा वृत्तसेवा
आर्णी,
apl cricket आर्णी पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित आलेल्या आर्णी एपीएल क्रिकेट स्पर्धेतून जमा झालेला 40 हजार रुपयांचा निधी सुशिलाबाई नागपुरे वृद्धाश्रमाचे खुशाल नागापुरे यांना देण्यात आला. पोलिस ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमात हा निधी सुपूर्द करण्यात आला.
 

apl cricket 
 
 
क्रिकेटला प्रोत्साहन मिळावे, तसेच खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी या उद्देशाने 16 ते 22 फेब्रुवारी दरम्यान एपीएल क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेनंतर विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर उर्वरित निधी सामाजिक कायार्साठी देण्याचा निर्णय ठाणेदार निलेश सुरडकर यांनी जाहीर केला होता.apl cricket त्या अनुषंगाने गुरुवारी ठाणेदार सुरडकर आणि सहायक निरीक्षक मिलिंद पारडकर, उपनिरीक्षक दुर्योधन राठोड, नरेंद्र देशमुख व कर्मचाèयांच्या उपस्थितीत वृद्धाश्रमाचे संचालक खुशाल नागपुरे यांच्याकडे 40 हजार रुपयांचा निधी सुपूर्द केला. या उपक्रमामुळे पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत वृद्धाश्रमाला मदतीचा हात दिल्याची भावना व्यक्त होत आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Powered By Sangraha 9.0