वर्धेतील तरुणांनी पटकावले ४५ पदकं

28 Feb 2026 18:45:17
१० वर्षांच्या माही मेहरेला राज्यस्तरावर कास्य
 
वर्धा, 
वर्धा जिल्हा अ‍ॅथलेटिस असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय sub-junior athletics competition सब-जूनियर मैदानी स्पर्धेत द ब्लूझ स्पोर्ट्स अकॅडेमी यांच्या अ‍ॅथलीट्सने दमदार कामगिरी करीत १५ सुवर्ण, १६ रौप्य, १४ कांस्य असे ४५ पदकं पटकावली. स्पर्धेत ३०० मीटर, १०० मीटर, ८० मीटर, ६० मीटर, ५० मीटर धाव, गोळा फेक, रिले व लांब उडी आदी स्पर्धा झाल्या. यात इंद्रा ठाकरे, प्रशब्दी, इशिता अविनाश भगत, प्रतीक सिंह, तृषा, माही मेहरे, प्रतिष्ठा, वीरा, शैश्लोक कुलमर्णी, हार्दिक, श्लोक, अद्वीक, कृष्णा, आर्तिका पांडे, स्वरा लाडे, जय अरोरा, देवर्ष अरोरा, लोगन सुखदेवे, अधिराज पहाडे, सान्वी, रिद्दान, आर्या अवचट, अनन्या, अमोल लाडे, अनुश्री मनोज टिचकुले, अर्णव डहाके, गुंजन रोहनकर, कुलभूषण लोखंडे, निधी, निहार शेळके, निवेदिता, रजत, राघव वैरागडे, शौर्य तडस, स्वरूप मोहर्ले व तनिष्क धोटे आदी अनेक स्पर्धकांनी विजयी कामगिरी दाखवली.
 
 
athletics
 
sub-junior athletics competition अनेक खेळाडूंनी तीनपेक्षा जास्त पदके मिळवली. स्पर्धेचे निवड झालेले खेळाडू कोपरगावमध्ये आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते. तिथे १० वर्षीय माही मेहरे हिने गोळा फेकमध्ये कांस्यपदक पटकावले. द ब्लूझ स्पोर्ट्स अकॅडेमीच्या या यशात प्रशिक्षक सुनील रोहनकर, आशिष बीडबाईक, विजय वैरागडे, प्रवीण मोहले, राधा मुळे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनीही उपस्थित राहून सहभागींचा उत्साहवर्धन केले व लहान खेळाडूंच्या खेळाप्रती असलेल्या निष्ठेचे कौतुक केले.
Powered By Sangraha 9.0