वृक्षतोड प्रकरणी महावितरणला ‘शो-कॉज’

28 Feb 2026 20:55:56
अचलपूर नगरपालिकेचा निर्णय
३० बहुपयोगी वृक्षांची कत्तल
 
अचलपूर, 
Achalpur Municipality परतवाडा शहरातील ऑक्सिजन पार्क मधील विना परवानगीने तीस ते चाळीस वृक्षतोड प्रकरणी नगरपरिषदेने महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शहरातील नदीच्या काठावर गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक पर्यावरण संघटना व नागरिकांनी निर्माण केलेल्या ऑक्सिजन पार्कमध्ये विविध प्रकारच्या निरनिराळ्या औषधी व पर्यावरणपूरक वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. या परिसरामधून महावितरण कंपनीची वीज वाहिनी गेली आहे.
 
 
vraksh
 
वादळामुळे झाडांचे स्पर्शाने विद्युतरांना स्पर्श होतो व कधीकधी वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे सदर Achalpur Municipality  झाडांच्या फांद्या कापून दूर करण्यात येतात. परंतु, ऑक्सीजन पार्कमधील २४ उंबर व ६ पिंपळाची वृक्ष असे ३० झाडे अवैधरित्या महावितरणने कापली आहे. विशेष म्हणजे हे करताना परवानगी सुद्धा घेतलेली नाही. घडलेल्या घटनेने स्थानिक निसर्गप्रेमी संघटना आक्रमक झाल्या आहे. त्यांनी सरळ नगर परिषदेमध्ये धडक देत कारवाई करण्याची मागणी केली. यासंदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी धीरज गोहाड यांनी महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना नोटीस बजावून आपणावर कारवाई का करू नये याबाबत लेखी जबाब मागितला आहे. संबंधित अधिकारी काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
वृक्षतोडणार्‍यांवर कारवाई व्हावी
आम्ही गेली वीस वर्षापासून या ठिकाणी विविध प्रकारच्या औषधी युक्त वृक्षांची लागवड केली आहे. लहान बाळाप्रमाणे आम्ही सांभाळून याचे संगोपन करतो. महावितरण कंपनीने विनापरवानगी वृक्ष तोडल्याने या कर्मचार्‍यांवर कारवाई व्हावी. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू.
-योगेश खानजोडे
पर्यावरण संघटना, अचलपूर
Powered By Sangraha 9.0