ग्रामीण रुग्णालयाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार

28 Feb 2026 17:37:14
मंगरूळनाथ,
येथील ग्रामीण रुग्णालयाला राज्य शासनाच्या व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा वंदनीय Balasaheb Thackeray Arogya Ratna Award बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण २२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील यशवंतराव सभागृहात महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 
AROGY
 
येथील ग्रामीण रुग्णालयाच्या सेवेमध्ये मोठे बदल झाल्याचे दिसून येत आहे. येथील आरोग्य यंत्रणा म्हणजेच रुग्णांचे सेवा सुश्रुषा व देखभाल सुद्धा चांगल्या पद्धतीने होत आहे. बाळांतपणासाठी येणार्‍या महिलांचे प्रमाण सुद्धा बरेच वाढले आहे. अनेक छोट्या-मोठ्या उपचारासाठी रुग्णांना आता बाहेर किंवा मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज राहिलेली नाही. रुग्णालयातील अंतर्गत स्वच्छतेत फार मोठा बदल करण्यात आला आहे. कर्मचारी सुद्धा तन्मयतेने रुग्णसेवा करीत आहेत. राज्य शासनाच्या व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनेराज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ पुरस्कारासाठी वाशीम जिल्ह्यातून एकमेव ग्रामीण रुग्णालयाने सन्मान पटकावला आहे.
 
 
यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांच्या मार्गदर्शनात व ग्रामीण रुग्णालय मंगरूळनाथ वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद शिंदे यांच्या तत्परतेने व सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या प्रयत्नाने हे Balasaheb Thackeray Arogya Ratna Award  पुरस्कार मिळाला आहे. सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा निंबेकर, डॉ.धनंजय लोखंडे, डॉ.इरफान शेख व अधिकारी कर्मचारी हजर होते.
Powered By Sangraha 9.0