यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना सशक्त
वणी,
तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून उबाठा शिवसेनेच्या काही ज्येष्ठ पदाधिकार्यांनी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत जिनिंगचे माजी अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे व पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या कार्यक‘मात कुळसंगे यांनी काँग्रेसला रामराम करीत ‘धनुष्यबाण’ हाती घेतले आहे.
Deputy Chief Minister Eknath Shinde उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व व विचारांवर विश्वास व्यक्त करत शुक‘वार, २७ फेब्रुवारीला वणी येथील उबाठा शिवसेनेचे कडवट सैनिक म्हणून ओळख असलेले दीपक कोकास, माजी नगरसेवक राजू तुराणकर व अजिंक्य काँग्रेसचे माजी झरी तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी अधिकृत प्रवेश घेतला. या घडामोडीमुळे शिवसेनेला मोठी बळकटी मिळाल्याचे मानले जात आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनी वणी, पांढरकवडा, झरी जामनी, राळेगाव व घाटंजी या तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन विस्ताराची मोहीम हाती घेतली आहे. राजकीय पक्षतील गावपातळीवरील प्रभावी पदाधिकारी व माजी पदाधिकार्यांना शिंदे गटात आणण्याची रणनीती आखली जात असून त्याला यश येताना दिसत आहे.
Deputy Chief Minister Eknath Shinde स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या की पक्षांतरांचे सत्र सुरू होते. दीपक कोकास, राजू तुराणकर व अजिंक्य शेंडे यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला स्थानिक पातळीवर धक्का बसल्याचे मानले जात आहे. जिनिंगच्या अध्यक्षपदावरून काँग्रेसच्याच संचालकांनी खुलसंगे यांना पायउतार केल्यामुळे ते अस्वस्थ होते. या संधीचा फायदा घेत पालकमंत्री राठोड यांनी जिल्ह्यात विकासाचा वेग वाढवण्यासाठी व संघटन बळकट करण्याची रणनीती आखली आहे. पुढील काळात आणखी मोठे प्रवेश होण्याचे संकेत आहेत. जिल्ह्यातील राजकारणात या घडामोडीमुळे शिवसेना बळकट होणार असून नवे समीकरण तयार होण्याची दिसू लागली आहेत.