दिग्रसच्या डॉ. वीरेंद्र अस्वार यांना ‘आरोग्यरत्न’ पुरस्कार

28 Feb 2026 10:40:14
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
dr virendra aswar अत्यंत सन्मानाचा समजला जाणारा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान 2026’ हा यंदा येथील ग्रामीण रुग्णालयाला मिळाला असून मुंबईला सोमवार, 23 फेब्रुवारीला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वीरेंद्र अस्वार यांना सन्मानित करण्यात आले.
 

वीरेंद्र अस्वार  
 
 
वैद्यकीय क्षेत्रात दिग्रस ग्रामीण रुग्णालयाने तालुक्यातील रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच डॉ. वीरेंद्र अस्वार यांचा रुग्णांशी असलेला सुसंवाद व तत्पर सेवा या योगदानासाठी त्यांची वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आणि महा आरोग्य सन्मान 2026 साठी निवड करण्यात आली होती.dr virendra aswar मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते डॉ. वीरेंद्र अस्वार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्थानिक पातळीवर पुरविल्या जाणाèया आरोग्यसेवांना राज्य पातळीवर मान्यता मिळाली आहे. ही दिग्रस आणि संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया असून ग्रामीण रुग्णालय व डॉ. वीरेंद्र अस्वार यांचे कौतुक होत आहे.
Powered By Sangraha 9.0