एका जागेसाठी कारंजा तालुयातील सहा उमेदवारी अर्ज दाखल
28 Feb 2026 18:28:03
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक
कारंजा लाड,
District Central Cooperative Bank अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संचालक मंडळ निवडणूक जाहीर झाली असून २६ आणि शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी कारंजा तालुयातील सहा जणांनी संचालक पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आता १८ मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने उमेदवारांच्या माघारीकडे लक्ष लागले आहे.
District Central Cooperative Bank महाराष्ट्र सहकारी संस्था नियम २०१४ च्या तरतुदीनुसार ही निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २७ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख होती.२ मार्च रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार असून ४ ते १८ मार्च पर्यंत अर्ज मागे घेता येईल.आणि २९ मार्च रोजी प्रत्यक्ष मतदान घेण्यात येऊन ३० मार्च रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. कारंजा तालुयातील एका जागेसाठी तालुयातील ६२ प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावून निवडणूक रिंगणातील उमेदवाराचे भाग्य ठरविणार आहे.त्यासाठी गावागावांत गाठीभेटी, बैठका आणि राजकीय चर्चांचा जोर वाढू लागला आहे.त्यामुळे सध्या कोण माघार घेणार याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांचा धुरळा उडत आहे.सहकार क्षेत्रातील ही निवडणूक केवळ बँकेपुरती मर्यादित नसून स्थानिक राजकारणाची दिशा ठरविणारी ठरणार असल्याने ३० मार्च रोजी जाहीर होणार्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निकालाकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.