३१५ सरपंचांनाच प्रशासक करा

28 Feb 2026 19:35:28
सरपंच संघटनेची एकमुखी मागणी
समुद्रपूर,
३ वर्षापासून कार्यकाळ संपलेल्या ३१५ ग्रामपंचायतीवर Gram Panchayat Sarpanch शासकीय कर्मचारी प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे येथील विद्यमान सरपंचाचे काय असा प्रश्न उपस्थित झाला. त्याच अनुषंगाने वर्धा येथील शासकीय विश्रामगृहात सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ३ वर्षापासून प्रशासक असलेल्या ३१५ ग्रापंवर सुद्धा तत्कालीन सरपंच हाच प्रशासक असावा या मागणीवर एकमत झाले. त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून वेळ पडल्यास कायदेशीर लढाई सुद्धा लढण्याची तयारी दर्शविण्यात आली.

sarpanch
महाराष्ट्रात जवळपास १६ हजार Gram Panchayat Sarpanch ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला असुन अनेक ठिकाणी शासकीय कर्मचार्‍यांची प्रशासक म्हणून नियुती केली आहे. प्रशासकराजमुळे गावातील विकास कामांना ब्रेक लागला आहे. याच धर्तीवर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपलेल्या ग्रापंवर २३ जानेवारीला शासकीय कर्मचार्‍यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश काढण्यात आला होता. याला आव्हान देत सरपंच संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याची दाखल केली होती. २० फेब्रुवारीला सरपंच परिषदेच्या माध्यमातून राज्यभर एक दिवसीय ग्रामपंचायत बंद आंदोलन पुकारले होते. शेवटी २१ जानेवारीला राज्य सरकारच्या वतीने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२६ च्या दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंचाची प्रशासक म्हणून नियुक्ती व उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची प्रशासक समितीवर नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे आता जिल्ह्यातील १ जानेवारीला २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ च्या दरम्यान मुदत संपलेल्या ४८ ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंचाची प्रशासक म्हणून नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतमध्येही सरपंचच प्रशासक म्हणून नियुत करण्याची मागणी करण्यात आली.
 
Gram Panchayat Sarpanch बैठकीत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या विविध समस्या आणि खोळंबलेली गावातील विकास कामे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विलास नवघरे, जिल्हा सचिव सचिन गावंडे, राजेश सावरकर, उपाध्यक्ष जगदीश संचारीया, सेलू तालुका अध्यक्ष दामिनी डेकाटे, सुजाता ताकसांडे, किशोर नेवल, संजय ढोवणे, अनंता हटवार, सचिव विनोद वानखेडे, सतिश ठाकरे, राजू नौकरकर, मुरलीधर चौधरी, जगदीश वरटकर, आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0