चेक अनादर झाल्यास दाखल होणार गुन्हा

28 Feb 2026 20:38:41
महावितरणची दिशाभूल करणार्‍यां विरूध्द कारवाईच्या मोहिमेला वेग
 
बुलढाणा, 
थकीत वीज बिलासाठी Mahavitaran महावितरणची वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी वटविले न जाणारे धनादेश देत महावितरणची दिशाभूल करत वेळ मारून नेणार्‍या वीज ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मोहिमेला अकोला परिमंडळात वेग देण्यात आला आहे. त्यामुळे धनादेश देतांनाच ते योग्यरित्या भरून द्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.
 
 
mah vitaran
 
Mahavitaran महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांनी वीज बिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी अकोला परिमंडळात दरमहा सरासरी २०० धनादेश अनादरीत (चेक बाऊंस) होत असल्याचे दिसून येत आहे. परंतू महावितरणच्या असे लक्षात आले की, काही वीज ग्राहकांनी दिलेल्या धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात पुरेशी रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश अनादरित होत असल्याचे आढळून आले आहे. परिणामी वीज बिलाची वसूली न होता थकबाकीत वाढ झाली आहे. त्यामुळे महावितरणने मोहिम घेत धनादेश अनादर झालेल्या वीज ग्राहकांवर कायदेशिर कारवाई करण्याच्या दृष्टिने हालचालींना गती दिली आहे.
 
 
 
याअगोदर चेक बाऊंस झाल्यास वीज ग्राहकांना प्रत्येक वीज बिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह ८८५/- रुपयांचा दंड संबंधित ग्राहकाच्या पुढील महिन्याच्या वीज बिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येते. तसेच अनादरित झालेल्या एकाच धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी स्वतंत्र दंडात्मक रक्कम लावण्यात येते. यासोबतच धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याची कारवाई करण्यात येते. यासोबतच Mahavitaran महावितरणने आता दिशाभूल करणार्‍या वीज ग्राहकांविरोधात कायदेशिर कारवाईची मोहिम हाती घेतली असून, या ग्राहकांविरूध्द निगोशिएबल इंन्स्ट्रुमेंट अ‍ॅट १८८१ , कलम १३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी धनादेश देतांना ते योग्यरित्या भरले आहे याची खात्री करावी. तसेच आवश्यक रक्कम खात्यात जमा असल्याची खात्री करावी असे आवाहन महावितरणने केले आहे.
Powered By Sangraha 9.0