नागपूर,
Janaprabha International भोजापूर (रामटेक) येथील जनप्रभा इंटरनॅशनलमध्ये मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीरामजी आष्टणकर मराठी मंडळ संचलित जनप्रभा संकुलात आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पराग जोशी उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून तसेच ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतात मराठी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध साहित्यपरंपरा आणि नव्या पिढीने मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा वापर वाढवण्याची गरज यावर मार्गदर्शन केले. तसेच विद्याजागर फाऊंडेशनचे सचिव डॉ. रामचंद्र जोशी सर यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले. Internationalयावेळी विद्यार्थ्यांनी कविता वाचन, भाषण आणि नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. मराठी भाषेवरील प्रेम आणि अभिमान व्यक्त करणाऱ्या सादरीकरणांमुळे कार्यक्रमात विशेष रंगत आली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुनिता शेंडे यांनी केले. त्यांच्या ओघवत्या आणि सुंदर निवेदनामुळे कार्यक्रम अधिक आकर्षक ठरला. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. Janaprabha International अशा प्रकारे मराठी दिन आनंददायी, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
सौजन्य: सारंग पांडे, संपर्क मित्र