नागपूर,
Ramakrishna Wagh College छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लता वाघ होत्या. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विजय पांढरीपांडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती व ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
डॉ. पांढरीपांडे यांनी मराठी भाषा ही आपली संस्कृती आणि ओळख असल्याचे सांगत तिचा दैनंदिन वापर वाढवण्याचे आवाहन केले. Ramakrishna Wagh College अध्यक्ष लता वाघ यांनीही मराठीचा सन्मान राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले. प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सौजन्य: सायली लाखे, संपर्क मित्र