मुंबई,
Nana Patekar अभिनेता Nana Patekar गेली अनेक वर्षे मराठी, हिंदी तसेच साऊथ चित्रपटसृष्टीत प्रभावी कामगिरी करत आहेत. नुकतेच *O’ Romeo* मध्ये झळकलेले नाना आता त्यांच्या पहिल्या OTT प्रोजेक्टसाठी सज्ज झाले आहेत. दिग्दर्शक Prakash Jha यांच्या दिग्दर्शनाखालील “Sankalp” या राजकीय थ्रिलर वेबसीरीजमधून ते डिजिटल विश्वात पदार्पण करत आहेत. ही वेबसीरीज Amazon MX Player वर प्रदर्शित होणार आहे.
“Sankalp” ही सामाजिक-राजकीय थ्रिलर सत्ता, धोरणे, विश्वास आणि प्रभाव यांच्या गुंतागुंतीभोवती फिरणारी कथा आहे. प्रोमोमध्ये नाना पाटेकर एका प्रभावशाली पंडिताच्या भूमिकेत दिसतात. मोठ्या आदराने त्यांच्या स्वागताने सुरुवात होते आणि प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येताना दिसतात. मात्र काही क्षणांतच त्यांच्या व्यक्तिरेखेचे आक्रमक आणि गूढ रूप समोर येते. अवघ्या 59 सेकंदांच्या या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.या मालिकेत नाना पाटेकर यांच्यासोबत Sanjay Kapoor, Kubbra Sait आणि Mohammed Zeeshan Ayyub यांसारखे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सामाजिक आणि राजकीय विषयांवर नेहमीच ठाम भूमिका मांडणारे नाना पाटेकर या मालिकेतही प्रभावी आणि तीव्र अंदाजात दिसणार असल्याचे संकेत प्रोमोमधून मिळतात.“संकल्प” ही मालिका मार्गदर्शन, विचारधारा आणि नीती यांच्या माध्यमातून सत्ता कशी निर्माण होते आणि संस्थांवर प्रभाव कसा टाकला जातो, याची थरारक कथा सांगते. बाह्य संघर्ष कमी असला तरी सामरिक डावपेच आणि नैतिक गुंतागुंत यामुळे कथानक अधिक रोचक बनते. या मालिकेची निर्मिती PJP फिल्म्स अंतर्गत ज्योती देशपांडे आणि दिशा झा यांनी केली आहे.नाना पाटेकर यांच्या पहिल्या वेबसीरीजला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि त्यांच्या आक्रमक शैलीचा डिजिटल प्लॅटफॉर्मवर कसा प्रभाव पडतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.