नागपूर
New English High School न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, महाल येथे विज्ञान दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वैज्ञानिक मॉडेल्स व आकर्षक चार्ट्सचे प्रदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व संशोधनवृत्तीचे दर्शन या घडले.
New English High School या प्रदर्शनीचे उद्घाटन दिलीप पेशवे यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह अजेय धाक्रस, वालेकर, मुख्याध्यापिका कान्हे, मुख्याध्यापिका पाठक, कापकर आदी उपस्थित होत्या.