ठाणेदारांनी भरचौकात टवाळखोरांना दिला चोप

28 Feb 2026 20:04:42
टवाळखोरांची दादागिरी वाढली दुकानदाराला मारहाण
 
बुलढाणा, 
शहरातील शाळा परिसरात टवाळ खोरांचा वाढता Nuisance उपद्रव दिसत आहे. दररोज शाळा महाविद्यालय भरतांना व सुटतांना टवाळखोर मुले मुलींची छेडखानी करतात मोटारसायकल भरधाव वेगाने चालवून कर्कश आवाजात हॉर्न वाजवून अनेक ठिकाणी अपघात घडत आहे. पोलिसांनी या घटनांची दखल घेत शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शाळा सुटण्याच्या वेळी भरचौकात टवाळखोरांना चोप दिला आहे.
 
 
po bul
 
काही Nuisance  टवाळ खोरांनी एका वयोवृद्ध दुकानदाराशी वाद घालत चॉकलेटचा डबा हिसकावून घेत तोडफोड केली. पैसे देईल, नाहीतर दुकान फोडून टाकेल अशा अरेरावीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेदरम्यान पालक मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना घेण्यासाठी उपस्थित होते. पोलिसांची गाडी दिसताच संबंधित तरुण पळून गेले.मात्र काही वेळातच साथीदारांना घेऊन पुन्हा येत त्यांनी वृद्ध दुकानदाराच्या अंगावर धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी छेडछाड विरोधी माजी प्रमुख प्रभाकर वाघमारे यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ठाणेदार रवी राठोड यांनी भरचौकातच टवाळखोरांना चोप देत त्यांना पालकांसमोरच पोलिसांच्या गाडीत बसवून पोलिसांनी टवाळखोरांना कडक इशारा दिला शाळा-महाविद्यालय परिसरात विशेष दामिनी पथक नेमून नियमित गस्त वाढवावी अशी मागणी पालकांनी केली आहे. 
Powered By Sangraha 9.0