नेटवर्कला अडथळा आणल्याने अनेकांवर गुन्हे दाखल
यवतमाळ,
विदर्भातील पुसद, अकोला, अमरावती तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पुणे येथील Pratap Technocat Co प्रताप टेक्नोक‘ॅट कंपनीमध्ये नेटवर्क मेन्टेनन्सचे काम करणार्या कर्मचार्यांनी काही दिवसांपासून चाललेला संप अखेर स्वतःहून मागे घेतला आहे. आपल्या आणि अवाजवी मागण्या मान्य करण्यासाठी ‘प्रताप’च्या या कर्मचार्यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून गणल्या गेलेल्या मोबाईल सेवेला नेटवर्क खंडित करून अडथळे आणले. अनेक ठिकाणी टॉवर आणि फायबरची नासधूस करून जिओ कंपनी आणि असं‘य ग्राहकांना वेठीस धरले होते.
विदर्भात मोबाईल टॉवर आणि फायबरच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी जिओने प्रताप टेक्नोक‘ॅट या कंपनीची नियुक्ती आहे. या कंपनीत काम करणार्या कर्मचार्यांनी अचानक काम बंद करून आपल्या अवाजवी मागण्या मान्य करण्यासाठी जिओच्या नेटवर्कला वेठीला धरले होते. ऐन परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांचा विचार न करता टॉवर बंद करून, फायबरची नासधूस करून अत्यावश्यक सेवेत त्यांनी अडथळा आणला. प्रताप टेक्नोक‘ॅटकडून याची गंभीर दखल घेऊन अनेक कर्मचार्यांवर कारवाई करून पुसद पोलिस ठाण्यात एफआयआरही दाखल केला होता.
विशेष म्हणजे नेटवर्क सुरळीत करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणार्या कंपनीच्या कर्मचार्यांना संप करणार्या कर्मचार्यांकडून धमकावण्यात आले, असाही आरोप प्रताप टेक्नोक‘ॅटने केला होता. या मनमानीला न जुमानता या कर्मचार्यांविरुद्ध कंपनीने अनेकांविरुद्ध पोलिसांकडे धावही घेतली होती. Pratap Technocat Co प्रतापच्या कर्मचार्यांनी आपल्या मागण्या मान्य झाल्याचा दावा केला. परंतु प्रतापकडून दाव्याचे खंडन केले गेले. मोबाईल सेवेला नुकसान पोेचविणे हा अक्षम्य अपराध मानला गेला आहे. असे असूनही मनमानीपणे आपल्या अवास्तव मागण्यांसाठी काही समाजकंटक कर्मचारी विनाकारण सर्वसामान्य जनतेला वेठीला धरून त्रास देत असून अशा अपप्रवृत्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची अपेक्षा सगळीकडून व्यक्त होत आहे.