प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची वार्षिक आमसभा संपन्न

28 Feb 2026 19:27:21
हिंगणघाट, 
Progressive Education Society प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी हिंगणघाटची वार्षिक आमसभेचे आयोजन भारत विद्यालयाच्या अटल लॅब येथे करण्यात आले होते. या सभेत संस्थेचा वार्षिक अहवाल वाचन, आर्थिक पत्रकांचे वाचन, मागील वर्षाचे इतिवृत्त वाचन संस्थेचे सहसचिव संजय देशपांडे यांनी केले.पुढील वर्षाच्या शैक्षणिक व विकासात्मक कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आर्थिक वर्ष सन २०२४- २०२५ चे हिशोब पत्रकास मंजुरी देण्यात आली.
 
 
Progressive Education
 
Progressive Education Society संस्थेंतर्गत चालणार्‍या नऊही शाळांच्या प्रगती अहवालचे वाचन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गोकुलदास राठी, सचिव रमेश धारकर, सहसचिव संजय देशपांडे, विजय अग्रवाल, प्रमोद हंबर्डे, बळिराम चव्हाण, सुवर्णा देशपांडे, संस्थेचे सभासद तसेच भारत विद्यालय, भारत उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम, श्रीमती सिरेकुँवरदेवी मोहता विद्यालय, भारत विद्यालय, भारत उच्च माध्यमिक कला विद्यालय वेळा, भारत नाईट हायस्कूल , चुन्नीलाल कटारिया प्राथमिक विद्यालय, भारत शिशु वाटीका व प्राथमिक विद्यालय, अभिनव शिशु वाटीका व प्राथमिक विद्यालय, माधव ज्ञानपीठ, माधव ज्ञानपीठ वेळा या शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0