मांगलादेवी येथील विशाल हिंदू संमेलन
मनीष पांगारकर
नेर,
तालुक्यातील मांगलादेवी येथे मंगलामाता संस्थान सभागृहात विशाल हिंदू संमेलनाचे करण्यात आले होते. यावेळी गावातील लक्ष्मी महिला मंडळ, मंजुळा महिला मंडळ, अवधूती भजनी मंडळ, सटवाजी भजनी मंडळ व अहिल्याबाई भजनी मंडळ आणि गावकर्यांच्या सहकार्याने दिंडी काढण्यात आली. त्यानंतर मंदिरात देवीची आरती गाऊन संमेलनाचे सुरुवात झाली. प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर हभप सुनील ढगे, विभाग मुख्य मार्ग Sanjay Khode संजय खोडे, ग्रामगीता प्रसारक विजय राऊत, सुचित दहेकर, रवीपाल गंधे, योगेश दहेकर या मान्यवरांची उपस्थिती होती.
Sanjay Khode यावेळी सुनील ढगे यांनी संघाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध धर्मजागृती उपक‘मांचे कौतुक केले. प्रमुख वक्ते संजय खोडे यांनी संघाचे काम समाजाला जागृत करण्याचे असून एकसंध हिंदू समाजाचे महत्त्व पटवून दिले. पिढ्यानपिढ्या चालत आलेले संस्कार जपत असताना पंचपरिवर्तनमधील सर्व घटक कसे उपयुक्त आहेत हे समजावू सांगितले. त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याचे दाखले दिले व हिंदू धर्माला खरी ताकद छत्रपती शिवरायांनी दिली, असे संजय खोडे यांनी नमूद केले. व्यासपीठावर उपस्थित इतरही मान्यवरांनी आपले समयोचित विचार मांडले. सूत्रसंचालन हर्षल राऊत, प्रास्ताविक योगेश दहेकर आणि आभारप्रदर्शन पिसे ह्यांनी केले. या संमेलनाचे संयोजक म्हणून विजय राऊत, सुजीत दहेकर व कार्तिक बावनकुळे ह्यांनी जबाबदारी पार पाडली. भारतमातेची आरती व प्रसाद वाटपाने संमेलनाची सांगता झाली.