नागपूर,
अँग्रोव्हिजन फाउंडेशन, गिन्नी ऍग्रो प्रॉडक्ट्स लि., पर्यावरण रिसोर्स सेंटरच्या संयुक्त विद्यमाने तूर पिकावर Shetkari Melava शेतकरी मेळावा व प्रात्यक्षिक कार्यक्रम १ मार्च रोजी सकाळी ८.३० ते सायं. ५.३० वाजतापर्यंत शुभारंभ सेलीब्रेशन लॉन, कळमेश्वर, येथे आयोजित करण्यात आला आहे. शेतकर्यांना नफ्याची आणि शाश्वत शेती पद्धतीकडे मार्गदर्शन करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. विशेषतः तूर पिकामधील उत्पादनवाढ आणि उत्पन्नवाढ यावर भर देण्यात येणार आहे.
याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून सिंह रघुवंशी तसेच अँग्रोव्हिजन फाउंडेशनचे सल्लागार डॉ. सी डी मायी उपस्थित राहणार आहेत. Shetkari Melava शेतकरी मेळाव्याचा उद्देश सुधारित शेती पद्धती, अधिक उत्पादन देणार्या बियाण्यांच्या जाती, इंटिग्रेशन मॉडेल आणि शेतकर्यांसाठी शाश्वत उत्पन्नाच्या संधी याबाबत जनजागृती करणे हा आहे. तसेच हा कार्यक्रम तज्ज्ञ आणि कृषी उद्योजक यांच्यात संवाद साधण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरेल. नोंदणी पूर्णपणे विनामूल्य असून नोंदणीसाठी आधार कार्ड व ७/१२ आवश्यक असून नोंदणी करून या महत्त्वपूर्ण कृषी प्रगतीच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आहे.