शोएब मलिक चौथे लग्न करणार चर्चा रंगली

28 Feb 2026 18:14:43
पाकिस्तान
Shoaib Malik पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि लोकप्रिय क्रिकेटपटू Shoaib Malik पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सध्या त्याच्या कथित चौथ्या लग्नाच्या बातम्या वेगाने व्हायरल होत असून, तो लवकरच पाकिस्तानी अभिनेत्री Vaneeza Sattar हिच्याशी विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. काही माध्यमांमध्ये मार्च महिन्यातच विवाहसोहळा पार पडू शकतो, असा दावा करण्यात येत असला तरी या वृत्तांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
 

Shoaib Malik, Pakistan, 
मलिक किंवा वनीजा या दोघांकडूनही या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी सोशल मीडियावर या बातमीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. जर या चर्चा खऱ्या ठरल्या, तर मलिकचे हे चौथे लग्न ठरेल. यापूर्वी त्याने आयेशा सिद्दीकी, भारतीय टेनिसपटू Sania Mirza आणि नंतर पाकिस्तानी अभिनेत्री Sana Javed हिच्याशी विवाह केला होता. सना जावेदशी विवाह केल्यानंतर काही काळातच पुन्हा नव्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
 
दरम्यान, वनीजा सत्तार ही पाकिस्तानी दूरचित्रवाणी क्षेत्रातील ओळखीचे नाव आहे. विविध मालिकांमधील भूमिकांमुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. Hum TVवरील ‘लाडली’ या मालिकेत तिने साकारलेली नाझो ही भूमिका विशेष गाजली होती. या भूमिकेमुळे तिला व्यापक लोकप्रियता मिळाली.
कराची येथील रहिवासी असलेल्या वनीजाने कराची विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातून ती येते. सोशल मीडियावरही तिची चांगली उपस्थिती असून इंस्टाग्रामवर तिचे एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. कुटुंबासोबतचे फोटो आणि व्यावसायिक आयुष्याचे क्षण ती नियमितपणे चाहत्यांसोबत शेअर करत असते.
मलिकच्या संभाव्य विवाहाच्या चर्चांमुळे पुन्हा एकदा त्याचे वैयक्तिक आयुष्य प्रकाशझोतात आले आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत या सर्व चर्चांकडे तर्क-वितर्क म्हणून पाहिले जात असले, तरी चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Powered By Sangraha 9.0