एआय तंत्रज्ञानाद्वारे माती परीक्षणासाठी सीएसआर निधी द्यावा

28 Feb 2026 21:27:02
केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांना निवेदन

यवतमाळ, 
महाराष्ट्र शेतकर्‍यांच्या Soil testing through AI technology मातीची सुपीकता तपासणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे उद्देशाने यवतमाळ येथील पुष्पाताई ग‘ामीण विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांना एआय कानपूर आयआयटी आधारित विशेष माती परीक्षण प्रकल्पासाठी सीएसआर निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे.
 
 
harivijay
 
आत्महत्याग‘स्त यवतमाळ जिल्हा हा शेतीप्रधान असून मातीची घटती सुपीकता, अयोग्य खत व्यवस्थापन आणि माती परीक्षणाचा अभाव यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेने आधुनिक एआय आणि एमएल आधारित भूपरीक्षक तंत्रज्ञानाचा वापर करून जलद, अचूक आणि तत्काळ माती परीक्षण सेवा उपलब्ध करून देण्याचा उपक‘म हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे शेतकर्‍यांना काही मिनिटांत माती परीक्षण अहवाल उपलब्ध होईल, योग्य खत मिळतील, उत्पादन खर्चात बचत होईल, तसेच पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. यामुळे शाश्वत शेती, माती संवर्धन आणि कार्बन क‘ेडिटसार‘या उपक‘मांनाही चालना मिळणार आहे.
 
 
Soil testing through AI technology  या प्रकल्पाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात एआय आधारित माती परीक्षणामुळे हजारो शेतकर्‍यांना थेट लाभ देण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. यासाठी सीएसआर निधीच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य मिळावे, अशी मागणी संस्थेने कृषी मंत्र्यांकडे केली आहे. केंद्र सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक‘म आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविल्यास शेतकर्‍यांचे ३० टक्के उत्पन्न वाढेल, रासायनिक खतावरील खर्च ६० टक्के कमी होऊ शकेल, मातीचे आरोग्य सुधारण्यास आणि कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास संस्थेचे सचिव हरिविजय (७७४५०६७४८१) यांनी व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0